
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी मुखेड- सुरेश जमदाडे
नांदेड आकाशवाणी केंद्राचे लोकप्रिय कार्यक्रमाधिकारी गणेश धोबे यांनी गुरुवारी ता. ९ रोजी अल्पावधीतच नावलौकीक मिळविलेल्या जिजाऊ ज्ञानमंदिरास सदिच्छा भेट दिली.
शाळेच्यावतीने संस्थापक ज्ञानोबा जोगदंड व मुख्याध्यापक जगदीप जोगदंड यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी किलबिल कार्यक्रमासाठी चिमुकल्या प्रियांशी जमदाडे (कथा ) व गीतगायना साठी आरोही जायमेत्रे (नर्सरी ) ,विनिता चव्हाण (तिसरी ) या मुलींची प्रसारणासाठी ऑडियो रेकार्डिंग करण्यात आले. कार्यक्रम प्रसारणाची वेळ व तारीख नंतर कळविण्यात येईल असे
कार्यक्रमाधिकारी गणेश धोबे यांनी सांगितले. शकुंतला गीते मॅडम व सुरेखा राठोड मॅडम यांनी विशेष परिश्रम घेवून मुलींकडून सराव करून घेतल्यामुळे या मुलींना आकाशवाणी नांदेड केंद्रावर कथा व गीतगायनाची संधी मिळाली आहे. संस्थाध्यक्ष ज्ञानोबा जोगदंड व कार्यक्रमाधिकारी गणेश धोबे यांनी या गुणी मुलींचे तोंडभरून कौतुक केले आहे .