
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
खुड्याचीवाडी :- कंधार तालुक्यातील खुड्याचीवाडी येथील प्रतिष्ठित महीला पद्मिनबाई मारोतराव खुडे यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी दि.१० डिसेंबर रोजी दुपारी ठीक एक वाजता वृध्दपकाळाने निधन झाले आहे.त्या शांतवृत्तीच्या शिक्षणावर प्रेम करणाऱ्या दूरदृष्टीच्या मातृत्वाचा अंत्यसंस्कार खुड्याचीवाडी येथे ११ डिसेंबर रोज रविवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला. आहे .सेवानिवृत शिक्षणाधिकारी तथा मराठा सेवा संघाचे माजी जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव खुडे यांच्या मातोश्री असून त्यांना मातृशोक झाला असून त्यांच्या दुःखात सर्व समाज सामील आहे.तसेच प्रगतशील शेतकरी श्री.किशनराव खुडे,प्राध्यापक श्री.अशोकराव खुडे व एक बहिण तसेच नात-नातू, पनतू असा मोठा परिवार आहे . त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना दैनिक चालू वार्ता परीवार त्यांच्या दुःखात सामील आहे.भावपुर्ण श्रद्धांजली.