
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री,रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
आर्णी येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह आर्णी जि. यवतमाळ येथे दि. २६ नोव्हेंबर २०२२ ते ०६ डिसेंबर २०२२ समतापर्व दरम्यान विविध स्पर्धा विद्यार्थिनींसाठी घेण्यात आल्या यामध्ये वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती राजश्री पेंदाम यांच्या नेतृत्वात ‘ वॉक फॉर संविधान’ रॅलीनी कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मा. प्रा. कैलास चव्हाण सर संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी V.M.V. कॉलेज अमरावती यांना आमंत्रित करून स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थीनीना योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच ०६ डिसेंबर ला महापरीनिर्वाणदिनी मा श्री. भोसले साहेब तहसीलदार आर्णी यांना प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते त्यांनी विद्यार्थीनीना योग्य ते मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय आर्णी येथील श्री. शेजव सर व श्री गुढे सर (ARSH CLINIC) यांनी विद्यार्थीनीना पौगंडअवस्थेतील शारीरिक व मानसिक बदलावर मार्गदर्शन केले तसेच एड्स, मार्गदर्शक कार्यक्रम घेण्यात आला. या समतापर्व कार्यक्रमाची सांगता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढून अभिवादन करून सांगता करण्यात आली.
यामध्ये वसतिगृहाचे कर्मचारी कु. राणी ठाकरे, रामटेके, चौधरी, इंगळे, जाधव, रामटेके सह सर्व विद्यार्थीनिनी सहकार्य केले असल्याचे पेंदाम मॅडम यांनी सांगितले.