
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा खरीप हंगामातील लागवड केलेला भाजीपाला, फळभाज्या यांना काही दिवस भाव मिळाला पण रब्बी हंगामात विक्रीसाठी तयार झालेला माल कमी दरात विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. मंठा बाजारात योग्य प्रमाणात भाजीपाला येऊ लागला आहे. त्यातही हिरवीमिरची,टोमॅटोची चांगली आवक बाजारात होत असल्याने टोमॅटोचे व हिरवीमिरची दर उतरले आहेत. शेतकन्यांनी तोडणी करून बाजारात विक्रीसाठी आणायला सुरवात केली तोच भाजीपाला आणि फळभाज्याचे गगनाला गेलेले दर खाली आले. शेतकन्यांना मोठा • आर्थिक फटका बसत आहे. शेतकऱ्यांना या किमतीत उत्पादन खर्च वसूल होणे अवघड झाले आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला टमाटे, फ्लॉवर, कोबी, दुधी भोपळा, दोडका, वांगे यांची लागवड केली जाते कोथांबीर, शेपू, पालक मेथी हिरवीमिरची या पालेभाज्या कमी दिवसात काढणीसाठी येतात. त्यामुळे त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, यंदा पाऊस भरपूर आता शेतकयांनी तातडीने शेतात मशागत करून भाजीपाला लागवड केली. मागील वर्षी चांगला दर मिळाला होता त्यामुळे काही अंशी आपल्या क्षेत्रात भाजीपाला जास्त लागवड केली. दोन महिन्यापूर्वी टमाटे तीस रुपये किलो विकली जायची तिच आज 10रुपये सरासरी विकली जात असल्यामुळे टॉमेटोचे भाव कमी झाल्याने आर्थिक फटका बसत आहे. भाजीपाला लावगड जास्त झाल्याने पंधरा दिवसांनी दुप्पट भाजीपाला मार्केटला येणार आहे.
त्यामुळे भाव आणखी कमी होतात का याची भीती व्यक्त केली जात आहे पत्तागोबी, फुलगोबीचे भाव कोसळले आहे. दुधी भोपळा, कारले, सिमला मिरची, दोडके यांचे भाव पंधरा दिवसापूर्वी होते. त्यापेक्षा निम्मे कमी झाले आहे पालेभाज्या स्थिर नाही कोथांबीर, शेपू मेथी यांचे दर प्रत्येक दिवशी कमी मेथी 10रुपये तीन चार जुड्या वांगी, टोमॅटो मिरची 10रुपयाला ढीग गोबीचे दहा रुपयाला दोन गड्डे
रात्रंदिवस मेहनत घेऊन शेतकऱ्यानी भाजीपाले पीक घेतले आहे. त्यात मध्ये अवकाळी पाऊस आल्याने त्यापासून पीक वाचविण्यासाठी शेतकयांनी हजारो रुपये खर्च केले. एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नसल्याने शेतकऱ्यांना मातीमोल किमतील मालाची विक्री करावी लागत आहे.राजकारण्यांकडून हे मुद्दे दुर्लक्षित केले जात आहे. शेतकयांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणीच वाली नसल्याची प्रतिकिय शेतकऱ्यांमधून उमटत आहे.
जोरदार सुरुवात झाल्याने यंदा शेतकरी मोठ्या आशेने भाजीपाला लागवडीकडे वळला होता. चार पैसे पदरात पडतील अशी अपेक्षा होती. दोन वर्ष कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आले होते. यंदा झीज भरून निघेल अशी अपेक्षा असली तरी हंगामाच्या सुरवातीला भाव पडले आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.