
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -सुरेश ज्ञा. दवणे …
मंठा.तालुक्यातील गत काही दिवसांपासून पारा घसरल्याने थंडीत वाढ झाली. या थंडीत पोलिस व सैन्य भरतीच्या तयारी सोबतच निरोगी शरीरासाठी तरुणांचा व्यायामाकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पहाटे कडाक्याच्या थंडीतही रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गर्दी दिसून येत आहे.
वातावरणात बदल होऊन थंडीला सुरूवात झाली असून आठवड्यापासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. दरम्यान शासनाकडून पोलिस व सैन्य भरतीची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे देशसेवेच्या आवडीने अनेक तरुण मैदानी चाचणीची तयारी करताना दिसून येत आहे. शिवाय निरोगी
आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व जाणून अनेक तरुण व शाळकरी विद्यार्थी मॉर्निंग वॉक व कसरत करताना दिसून येते आहे. तरुण मंडळीसह वयोवृद्ध ही व्यायामाला महत्त्व देत असून सपत्नीक व्यायाम करताना दिसत आहे. मेसखेडा,हिवखेडा जाटखेडा,ढोकसाळ , नायगाव, तळेगाव, माळेगाव, केहाळ वडगाव या गावातील लोणार व मंठा मार्गावर मॉर्निंग वॉकला मोठ्या प्रमाणात तरुणांची फौज दिसून येते.