
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्याचे सुपुत्र तथा ठाणे येथील धर्मादाय कार्यालयात आयुक्त पदावर कार्यरत न्या.पद्माकर धोंडगे यांची मंत्रालयात राज्याच्या विधी व न्याय विभागात अवर सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सोनपेठ तालुक्यातील आवरगाव येथे जन्मलेले तथा नरवाडी येथील नरसिंह महाविद्यालयात शिक्षण घेतलेले न्याव पद्माकर धोंडगे यांनी नुकताच लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरतीमध्ये ज्या परिक्षा झाल्या होत्या, त्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ऑक्टोबर मध्ये त्या परिक्षेचा निकाल लागला असून न्या. धोंडगे यांनी अव्वल क्रमांक पटकावत जन्मभूमी आवलगाव चे नाव सुध्दा रोशन केले आहे.
त्यांच्या या निवडीमुळे आवलगावसह शिक्षण घेतलेल्यानरवाडी येथील महाविद्यालयात कमालीचा आनंद व्यक्त केला जात आहे. एवढेंच नाही तर त्यांनी शिक्षण घेतलेल्या नरसिंह महाविद्यालयातर्फे न्या. धोंडगे यांचा जाहीर सत्कारही केला गेला आहे. आवलगावसारख्या एका गावखेड्यात जन्म घेतलेल्या पद्माकर नामक तरुणाने राज्याचा कारभार चालवला जातो, त्या मंत्रालयातील थेट झेप घेऊन गाव खेड्यातला मुलगा काय करु शकतो हे दाखवून दिले. मनाशी जिद्द, चिकाटी, मेहनत आणि ध्येयाची खूनगाठ बांधून साध्य करण्याचा प्रयत्न जरी झाला तर नक्कीच यश चालून येते असं म्हणतात. आवलगावच्या पद्माकर नेहमी नेमकं तेच केलं असावं, हे या गरुड झेपेमुळे नक्कीच दिसून आल्यास नवल वाटू नये. अगोदर न्यायाधीश व आता राज्याच्या विधी व न्याय विभागात थेट अवर सचिव बणून पद्माकर ने आजच्या तरुणाईपुढे एक आगळा वेगळा आदर्श ठेवला आहे. श्री. धोंडगे यांचे त्रिवार अभिनंदन करुन त्यांना पुढील सेवेचा काळ अत्यंत फलदायी असाच ठरला जावो, अशी विनम्र प्रार्थना दै.चालू वार्ताच्या वतीने आई तुळजाभवानी चरणी केली जाणे स्वाभाविक आहे.