
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा – संभाजी गोसावी
जि. ता. बोरगांव पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या कार्यकाळामध्ये बोरगांव पोलीस ठाण्यांचा पदभार हाती घेतल्यापासून. बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक मोठमोठे गुन्हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांंसमवेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. चेतन मछले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या आदेशावरुन अनेक गुन्हे उघडकीस आणले. मोटार सायकल चोरीचा असाच गुन्हा बोरगांव पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दि.१० डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारांस बोरगांव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी हे पेट्रोलिंग करीत असताना मौंजे नागठाणे ता.जि.सातारा गावच्या हद्दीमध्ये सातारा-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरती रोडच्या कडेला एक संशयित अज्ञात इसम संशयरीत्या फिरत असल्यांचे बोरगांव पोलिसांच्या निदर्शनांस आले. व त्याच्या हालचालीवरुन पोलिसांनी त्यास जागीच पकडून त्याच्याकडे अधिक सखोल चौकशी केली असता. प्रथम त्याने पोलिसांना उडवा-उडवीची उत्तरे तो देऊ लागला त्यामुळे पोलिसांनी त्यास बोरगांव पोलीस ठाण्यांत आणून त्याची चांगलीच चौकशी केली. यानंतर तो पोपटासारखा पोलिसांना उत्तरे देवु लागला. तसेच त्याने उंब्रज पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील मोटारसायकल चोरी केली बोरगांव पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्या कब्जांतील मोटार सायकल क्र. एम .एच १२ ई .ए.८६०८ ही जयभावनी सा.मिल उंब्रज या ठिकाणावरुन त्याने चोरी केल्यांची कबुली बोरगांव पोलिसांना दिली. यावेळी बोरगांव पोलिसांनी उंब्रज पोलीस ठाण्याशी संपर्क साधून चोरीस गेलेल्या मोटरसायकल बाबत विचारपूस केले असता सदर मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार उंब्रज पोलीस ठाण्यांत दाखल होती. त्यानुसार बोरगांव पोलिसांनी सदर आरोपी व चोरीतील हिरो होंडा मोटारसायकल अधिक तपासणी करिता बोरगांव पोलिसांच्या ताब्यांत देण्यात आली. दत्तात्रय रामचंद्र तुपे वय ३२ रा. वडोली भिकेश्वर ता.कराड जि. सातारा) असे आरोपीचे नाव आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांच्यासह बोरगांव पोलीस ठाण्यांतील पोलीस कर्मचारी दादा स्वामी,प्रशांत मोरे,किरण निकम ,विशाल जाधव आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून कौतुक