
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रेनिमित्त (दि.१०) रोजी शनिवारी नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली व लातुर लोकसभा मतदार संघाचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी यात्रा सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे,उपजिल्हाधिकारी देवकुळे मैडम, संदिप मुपाकले,अतिरिक्त पोलीस अधीक्षक भरणे,पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे,जिल्हा परिषद माजी अर्थ व आरोग्य सभापती प्रवीण पाटील चिखलीकर,प्रणिता देवरे चिखलीकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य माणिकराव मुकदम,लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी,उपाध्यक्ष दत्ता भाऊ वाले,माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, नगरसेवक भास्कर पाटील पवार,भाजपा तालुकाध्यक्ष तथा माजी पं.स.सभापती आनंदराव पाटील शिंदे,माजी उपसभापती बालाजी पाटील,माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड, गटनेते करिम शेख,माजी जि.प.सदस्य चंद्रमुनी मस्के,रोहित पाटील,जफरोद्दीन बाहोद्दीन, सचिन पाटील चिखलीकर, माजी जि.प.सदस्य देविदास महाराज गीते, गणेशराव उबाळे, जिल्हा प्रा. शिक्षणाधिकारी सविता बिरगे, जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे,उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगांवकर,तहसीलदार व्यंकटेश मुंडे,लोह्याचे गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे,मांजरमकर,तालुका कृषी अधिकारी पोटपेलवार, गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, महावितरण चे वाघमारे,लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे,माळाकोळी सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक डोके, प्रमुख उपस्थित होते.
यावेळी यात्रा सचिव डॉ.सुधीर ठोंबरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सदरिल माळेगांव येथील खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माळेगाव यात्रेत येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा सादर केला.यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा विभाग, महावितरण विभाग,एस टी महामंडळ, उत्पादन शुल्क, आरोग्य विभाग,कृषी विभाग, पशुसंवर्धन, महसूल,जि.प.बांधकाम,डीआरडीए, महिला बालकल्याण,शिक्षण विभाग,पीडब्ल्युडी यांच्या प्रमुखांना सुचना देत यात्रेकरूच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सुचना दिल्या.त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचे अखंडित वीजपुरवठा व येणाऱ्या सर्व भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी त्यासाठी टैंकर व विविध ठिकाणी यात्रेमध्ये ज्या काही सुविधांची उणिवा दिसतील त्या उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी खासदार चिखलीकर व खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी दिले. पालखी मार्गाच्या रस्त्याचे काम,शिक्षण,कृषी विभागाच्या वतीने विविध स्टॉल उभारण्यात येणार आहेत.यात्रा काळात सुरक्षेच्या दृष्टीने मुबलक पोलिस अधिकारी व कर्मचारी, होमगार्ड सह तगडा बंदोबस्त यात्रा काळात दठेवण्यासंदर्भात पोलीस विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या यात्रेत डॉग,उंट,गाढव,घोडा यांच्या शर्यती तसेच विविध स्टॉल सह पारंपारिक लोककला महोत्सव, लावणी महोत्सव चांगल्या प्रकारे व्हायला हवा अशी संबंधितांकडून अपेक्षाही अनेकांनी मनोगतातून व्यक्त केली.
यावेळी खासदार सुधाकर श्रृंगारे म्हणाले कि,मी जरी नवखा असलो तरी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना चांगला अनुभव आहे, विलासरावांची परंपरा चिखलीकर जोपासत आहेत.कानाकोपरातून भाविक येतात, येथे मोठा बाजार भरतो.लोकांना लाजवेल अशी यात्रा व्हावी असेही ते म्हणाले.
पूर्वतयारी आढावा बैठकीच्या अध्यक्षीय समारोपात बोलताना खासदार चिखलीकर म्हणाले की, नांदेड जि.प.मध्ये १९९२ पासून मी स्वतः दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रेसंदर्भात प्रत्यक्ष जाणून आहे.कै.व्यंकटरावजी मुकदम यांच्या प्रेरणेतून कला महोत्सवाची सुरूवात झाली असल्याचे त्यांनी भाषणातून सांगितले.सारंगखेड प्रमाणे माळेगांव ची यात्रा व्हावी अशा आशावाद ही व्यक्त केला.माळेगांव यात्रेत येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान व्हायला पाहिजे तो भाविक कोणत्याही पक्षाचा असो आहे म्हणत त्यांनी दिलेल्या निधीचाही उल्लेख माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच भाविकांचे व प्रत्येक विभाग म्हणणे ऐकून घेत आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. माळेगाव यात्रेचे वैभवात भर पाडण्यासाठी यात्रा वाढविण्याच्या दृष्टीने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे नियोजन करण्यास व गालबोट न लागता यात्रा पार पाडण्यासाठी व यात्रेत येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना मूलभूत सोई सुविधा पुरविण्यासाठी सर्व विभागाने तत्परतेने तयारी करून मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रामाणिक व काटेकोर प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.