
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहरातील जुना लोहा येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील लक्ष्मीकांत कहाळेकर हा विद्यार्थी जिद्द, मेहनत,व कठोर परिश्रमाच्या जोरावर रात्र-न- दिवस अभ्यास करून वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या एमबीबीएससाठी पात्र ठरून जळगाव येथील शासकीय एमबीबीएस काॅलेजला प्रवेश मिळाला परंतु घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असुन वडीलाचे क्षेत्र हरवले आहे आई शिवणकाम करून घर चालविते लक्ष्मीकांत कहाळेकर हा एमबीबीएससाठी पात्र ठरल्यामुळे त्याला पुढील शिक्षणासाठी आर्थिक चणचण भासत असल्यामुळे एका स्थानिक वर्तमानपत्रात लक्ष्मीकांत कहाळेकर यांना आर्थिक मदत करा म्हणून बातमी प्रकाशित झाली आहे.
तेव्हा यांची दखल लोहा न.पा. चे कर्तव्यदक्ष नगरसेवक भास्करराव पाटील पवार यांनी घेऊन लक्ष्मीकांत कहाळेकर यांच्या घरी जाऊन लक्ष्मीकांत कहाळेकर यांचा सत्कार करून त्यांना एमबीबीएच्या शिक्षणासाठी रोख ५००० हजार रुपये देऊन आर्थिक मदत केली.
तसेच समाजातील अनेक श्रीमंत असलेले व्यापारी, सरकारी नौकरदार , लोकनिनिधी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासुन एमबीबीएससाठी पात्र ठरलेल्या व भावी डॉक्टर असलेल्या लक्ष्मीकांत कहाळेकर यांना जमेल तशी आर्थिक मदत करावी असे आवाहन नगरसेवक भास्करराव पाटील पवार यांनी केले आहे.