
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा.शेगाव पंढरपूर महामार्गास तळणी ते आष्टी पर्यंत लागनारे सर्व मटेरिअल खडी, मुरुम प्लान्ट जमिन घेऊन क्रेशर प्लान्ट दहिफळ खंदारे येथे उभारुन अति प्रमाणात मट्रेल अवजड वाहनांची वाहतूक झाल्यामुळे दहीफळ खंदारे फाटा ते आनंदवाडी रोड संपूर्ण खड्ड्यात जमा झाला, माननीय आमदार बबनराव लोणीकर यांनी दहीफळ खंदारे फाटा ते आनंदवाडी रस्ता सय्यद काॅन्टक्टर द्वारे नवीन डांबरीकरण करून काम पुर्ण करून दीले होते आणि लगेच शेगाव पंढरपूर महामार्गाचे काम चालू झाले, दहीफळ खंदारे येथील सर्व गावकऱ्यांना मेघा कंपनी शेगाव पंढरपूर महामार्ग चे काम पूर्ण झाले की तुम्हाला नवीन रस्ता करून देऊ असे महामार्गाच्या कामची सुरुवात झाली त्यावेळी सांगितले होते परंतु महामार्गचे काम पूर्ण झाले परंतु गावातील रस्ताचे काम करून न देता कंपनीने हळूहळू आपले क्रेशर, प्लान्ट कंपनीचे सर्व साहित्य गावकर्यांचा डोळ्यात धूळ फेकून घेऊन गेले आहेत यामुळे दहीफळ खंदारे ग्रामस्थांना गावात येणेजाणे खड्डेमय झालेल्या रस्त्यावर अवघड झाले आहे, गावात सरकारी केन्द्रिय शाळा, कॉलेज, मध्यवर्ती सहकारी बँक, केन्द्रिय आरोग्य केंद्र असल्याने पंचक्रोषितील नागरिकांना व गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी गावकर्यांकडू होत आहे.
लवकरच यारस्त्यासाठी सर्व दहीफळ खंदारे गावकर्यांच्या वतीने अर्ज करून माननीय आमदार बबनराव लोणीकर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केन्द्रिय मंत्री नितीन गडकरी साहेब यांना निवेदन देण्यात येणार आहे असे दैनिक चालू वार्ताशी बोलताना दहीफळकर श्री रामेश्वर छगनराव भोसले यांनी सांगितले.