
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी-शहाबाज मुजावर
राज्य शासनाच्या माझी वसुंधरा २.० अभियानामध्ये पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने उत्कृष्ट कामगिरी करत पुणे विभागात प्रथम क्रमांक तर राज्यामध्ये नगरपरिषद या कॅटेगरीमध्ये राज्यात चौथा क्रमांक पटकावला होता. दरम्यान या स्पर्धेच्या बक्षीसाचीही शासनाने घोषणा केली असून, यात पन्हाळा नगरपरिषदेस दीड कोटी रुपयांचे रोख बक्षीस प्राप्त झाले आहे अशी माहिती मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी दिली.
निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान २.० हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये १६ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीमध्ये राबवण्यात आले. पन्हाळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानाप्रमाणेच माजी वसुंधरा अभियानामध्ये आपली कामगिरी उंचावत शहराचा नावलौकिक पूर्ण जगभर वाढवला आहे. यासाठी पन्हाळा शहरातील सर्व नागरिक, नगरपरिषदेतील सर्व कर्मचारी अधिकारी, सफाई मित्रांनी झोकून देऊन शेअर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी योगदान दिले आहे. नगरपरिषदेस मिळालेल्या या बक्षीसाबद्दल मा. आमदार डॉ विनय कोरे (सावकर), माजी नगराध्यक्षा सौ. रूपाली धडेल, सर्व माजी नगरसेवक व नगरसेविका, तत्कालीन मुख्याधिकारी स्वरूप खारगे, मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी सर्व अधिकारी कर्मचारी तसेच सर्व सफाई मित्रांचे अभिनंदन केले. माझी वसुंधरा अभियानामध्ये उच्चतम कामगिरी करण्यासाठी माननीय आमदार डॉ विनय कोरे (सावकर), नगराध्यक्षा सौ. रूपाली धडेल, तत्कालीन मुख्याधिकारी स्वरूप खारगे, अधिकारी वर्ग, सर्व सफाई मित्र आणि पन्हाळा येथील सर्व नागरिकांचे योगदान लाभले.