
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा – संभाजी गोसावी
जि. दहिवडी माण तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला गेला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यांतील माण तालुक्यांत जवळपास ३० ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून. रविवार दि.१८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. याच अनुषंगाने माण तालुक्यांमध्ये कायदा-सुव्यवस्था अबधित राहण्यासाठी दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली माण तालुक्यांमध्ये विविध गावांमध्ये दहिवडी पोलिसांनी रूट मार्च काढून सूचना करण्यात आल्या. तसेच गावातील उमेदवारांनी निवडणूक आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे निवडणूक दरम्यान कोणतेही उमेदवारांनी मतदानासाठी धमकविणे, पैसे देणे अशी कृत्य उमेदवाराकडूंन आढळून आल्यांस त्यांच्यावर कारवाई करण्यांत येईल असेही सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सांगितले. यावेळी आंधळी यासह परकंदी कासारवाडी वावरहिरे बिदाल आदी गावातून सुद्धा दहिवडी पोलिसांनी संचलन करुन सूचना दिल्या. हा रुट मार्च दहिवडी पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय तुपे गोपनीय इंदलकर यांच्यासह होमगार्ड व दहिवडी पोलीस ठाण्यांतील आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या रुट मार्चमध्ये सहभाग घेतला.