
दैनिक चालू वार्ता परभणी उपसंपादक- दत्तात्रय कराळे
एके काळचे प्रख्यात असे तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेले आणि नवसाला पावणारे हजारो लोकांचे श्रध्दास्थान म्हणून सर्वदूर परिचित असलेले परतगंगा अंतेश्वर या स्थानाचे “तीर्थक्षेत्रीय गतवैभव” पुन:स्थापित करावे अशी मागणी भूमीपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय वामनराव कराळे यांची महाराष्ट्र शासनाकडे राहिली जाणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील व लोहा तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावरील गाव म्हणजे अंतेश्वर. महाराष्ट्र राज्याची प्रमुख नदी गोदावरी काठावर वसलेले हे गाव. पूर्वापार चालत आलेली येथील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा सर्वदूर परिचित आहे. नदीकाठावरील अंतेश्वर नगरीच्या तिन्ही भागाचा परिघ हा परभणी जिल्ह्यात मोडत आहे. एका बाजूला