
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- अंधोरी ता अहमदपूर जि लातूर येथे दि ११ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६:३० वा एका ३० महिलेस दुचाकीसवाराची धडक बसून मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर महिलेस उपाचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी येथे आणले असता त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसून अंबुलेन्स सुद्धा उपलब्ध नसल्याने रुग्णाला ग्रामीण रुग्णालय अहमद्पुर येथे आणले असता त्याचा मृत्यु झाला.
प्रा आ केंद्र अंधोरी येथे डॉक्टर उपलब्ध असते तर कदाचित रुग्णाचे प्राण वाचले असते अंधोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील मनमानी कारभार दिसून येत आहे याची गंभीरपणे चौकशी झाली पाहिजे असा गंभीर आरोप नातेवाईकांनी करून संताप व्यक्त केला आहे