
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्हा परिषदेच्या जल गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत महिला,जलरक्षक,आरोग्य कर्मचारी आदींच्या देख-रेखीखाली संपूर्ण जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायत क्षेत्रातील जलस्रोतांचे नमुने घेतले जाणार आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
जलजीवन मिशन अभियानांतर्गत जलस्रोतांचे नमुने गोळा करणे आणि पाणी गुणवत्ता नियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाद्वारे चाचणी करणे याबाबतची माहिती केंद्र सरकारच्या वतीने जिल्हा परिषदेत गेले होते.यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावात फील्ड टेस्ट किटद्वारे ८४० ग्रामपंचायतींच्या ६९९१ जलस्त्रोतांची जैविक चाचणी घेण्यात येत आहे.यामध्ये जलस्रोताशिवाय शाळा,अंगणवाडी,शासकीय कार्यालयातील पाण्याच्या स्त्रोताचीही मैदानी चाचणी संचाद्वारे केली जाणार आहे.शुद्ध पाणी आरोग्याची हमी देते.यामुळे गाव ग्रामपंचायत क्षेत्रात महिला,जलरक्षक,आरोग्य कर्मचारी स्वत: करणार आहेत.पाणी व स्वच्छता विभागासह भूजल सर्वेक्षण विभागामार्फत जिल्हा पाण्याच्या नमुन्यांची चाचणी वर्षातून दोनदा केली जाते आणि ग्रामपंचायत स्तरावर पाण्याची जैविक चाचणी क्षेत्रीय चाचणी कीट द्वारे केली जाते.या जलस्रोतांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी द्यायचे आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पांडा,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती व पाणी गुणवत्ता सल्लागार निलिमा इंगळे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे.
—————————————-
जिल्ह्याचे तहसील निहाय जलस्त्रोत
अमरावती ७९९
अचलपूर ४९३
अंजनगाव सुर्जी १८०
भातकुली ३८६
चांदूर बाजार २६६
चांदूर रेल्वे ५६४
चिखलदरा ३१६
दर्यापूर ४१
धामणगाव रेल्वे ८३४
धारणी ५५९
मोर्शी ४३३
नांदगाव खंडेश्वर १०६९
तिवसा ५४०
वरूड ५११
—————————————-
एकूण ६९९१
—————————————-