
दैनिक चालू वार्ता परभणी उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : पूर्णा तालुक्यातील बरबडी येथे महारुद्र यात्रेनिमित्त कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित करण्यात आली होती.
शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ सोलव यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य दिग्गज मल्लांना रुपये पाच लाखांची बक्षिसे वितरीत करण्यात आली.
सोमनाथ सोलव यांच्या संस्थापकीय अध्यक्षतेखाली स्थापन व कुशल नेतृत्वाखाली कार्यरत शिवशाही ग्रुपच्या परभणी व नांदेड जिल्ह्यात गावोगावी शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत. या शाखांच्या माध्यमातून हजारो तरुण जोडले गेले आहेत. रंजल्या-गांजलेल्यांना सदैव मदत करणे हा या संस्थेचा उद्देश आहे. सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या सोमनाथ सोलव यांनी शेतकरी, कष्टकरी व तरुणाईच्या कल्याणासाठी जे जे करणे शक्य आहे, त्यासाठीचे अथक प्रयत्न मागील अनेक वर्षांपासून सातत्याने चालू ठेवले आहेत. शेतकरी, कष्टकरी यांच्यावर होणारा अन्याय दूर करुन सोमनाथ सोलव आणि त्यांचे असंख्य सहकारी शासन दरबारी अडलेली त्यांची कामे नेटाने पार पाडीत असतात.
शासन-प्रशासन आणि नागरी समाज तसेच राज्यकर्ते व सामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून ओळख असलेले सोमनाथ सोलव यांच्याकडे पूर्णा तालुक्यातील विशेषतः चुडावा सर्कलमधील अधिकांश जनता एका आगळ्या वेगळ्या अपेक्षेने बघत असतात. गोरं गरिबांचं व समस्त शेतकऱ्यांचं हित जोपासणारा एक उमदा नेता म्हणून सोलव यांच्याकडे बघितले जात आहे.
गेली अनेक वर्षांपासून सोमनाथ सोलव यांनी शिवशासन ग्रुपच्या माध्यमातून गावे न् गावे पिंजून काढली आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून गावो गावच्या तरुणाईचे ते विश्वसनीय आदर्श बनले गेले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून सोलव यांनी भाजपाची कास धरली आहे. भाजपाच्या माध्यमातून सोलव यांना जनसेवेसाठी आणखी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. पक्ष व संघटना या दोहोंच्या अधिकारातून त्यांच्या जनसेवेला अधिक बळकटी मिळाल्याची जोरकस चर्चा आहे. भाजपाने आगामी काळात निवडणूकीचा माध्यमातून एखादी जबाबदारी टाकली गेल्यास निश्चितच जनता त्यांना भरभरुन साथ देईल व विजयाची पताका फडकविण्यासाठी यशस्वी केल्याशिवाय राहणार नाहीत जणू अशीच चर्चा सर्वत्र असल्याचे बोलले जात आहे. नुकताच पूर्णा तालुक्यातील बरबडी येथे आयोजित भव्य अशा कुस्तीच्या दंगलीवेळी जनतेने त्यांना भरभरुन साथ व औदादार्याचा हात बरेच काही सांगून जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य व दिग्गज मल्लांना सुमारे पाच लाख रुपयांची बक्षिसे वितरीत करुन जनतारुपी सहकार्यामुळे जणू हेच सिद्ध होत आहे की, सोलव यांच्याप्रति असलेले प्रेम व सद्भावना पहाता प्रत्येकाच्या रोमा रोमात सोमनाथ एके सोमनाथ असल्याचे दिसून आले. ज्या महारुद्राच्या नावाने त्यांनी कुस्त्यांची दंगल भरवली त्याच बजरंगांचा आशीर्वाद सोमनाथ यांच्या पाठीशी सदैव राहिला जाईल यात शंकाच नाही. त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस दै. चालू वार्ता तर्फे श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी विनम्र प्रार्थना करीत आहे.