
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्याचे सुपुत्र संतोष राजगुरू यांची सावता परिषदेच्या प्रदेश मुख्य संघटक पदी फेर निवड झाल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे मा पालकमंत्री आमदार दत्ता मामा भरणे यांनी व इंदापूर तालुक्याचे सुपुत्र मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने साहेब यांनी जाहीर सत्कार केला.
नुकतीच बीड येथे सावता परिषदेचे प्रदेश कार्यकारणीची दोन दिवशी मीटिंग संपन्न झाली. संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली ही मीटिंग संपन्न झाली या मीटिंगमध्ये २७ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते, त्यांचा कामकाजाचा आढावा घेण्यात आला व आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे साहेबांनी प्रदेश कार्यकारणी जाहीर केले यामध्ये संतोष राजगुरू यांची प्रदेश मुख्य संघटक मधून फेर निवड करण्यात आली. आपल्या भाषणामध्ये बोलताना कल्याण आखाडे म्हणाले संतोष राजगुरू हे माझे अत्यंत विश्वासू आणि तळमळीने काम करणारा कार्यकर्ता आहे म्हणून मी त्यांची प्रदेश मुख्य संघटक म्हणून फेर निवड जाहीर करत आहे ,या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमरसिंह पंडित आमदार संदीप भैय्या क्षीरसागर उपस्थित होते .
संतोष राजगुरू यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदनच वर्षाव व शुभेच्छा समाज बांधव देत आहेत नुकताच आमदार दत्तामामा भरणे साहेब यांनी व आमदार यशवंत माने साहेब यांनी त्यांचा सत्कार केला व संतोष राजगुरू यांच्या कामाचे कौतुक केले आगामी काळामध्ये आपण संतोष राजगुरू यांना पाठबळ देणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे साहेबांच पाठबळ देणार असल्याचे त्यांनी केले यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष प्रकाशने नेवसे जिल्हा उपाध्यक्ष राहुल जनावरे राष्ट्रवादीचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष तात्यासाहेब वडापुरे, राष्ट्रवादीचे नेते संदीप भोंग ,पिटकेश्वर चे सरपंच भोसले, माजी सरपंच संजय कांबळे विकास सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव किरकत, सामाजिक कार्यकर्ते अशोक भोंग, महादेव भोंग राष्ट्रवादीचे तालुका प्रवक्ते अतुल आप्पा मिसाळ, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष अमर बोराटे, खरेदी विक्री संघाचे संचालक कोंडीबा भोंग, तालुका उपाध्यक्ष विष्णू झगडे, पीटकेश्वर चे सरपंच हनुमंत भोसले, विकास सोसायटीचे चेअरमन शिवाजी किरकत, पीटकेश्वर चे माजी सरपंच संजय कांबळे, सारंग मेहता, शेरखान पठाण, कपिल हेगडे, दादासाहेब पाटील, विकास सोसायटीचे संचालक महादेव जी शेंडे, तालुका संघटक सुहास भोसले, सामाजिक कार्यकर्ते इंदापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख सचिन शिंदे, शाखा अध्यक्ष भोडणी अजय गवळी, दादासाहेब पाटील, दैवत पवार उपस्थित होते.
प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू म्हणाले आगामी काळामध्ये सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे साहेबांचे हात बळकट करून गाव तिथे सावता परिषद उभारणार आहे वाड्या वस्त्या वर सुधा सावता परिषदेचा झेंडा उभारणार आहे. यामध्ये या पुढील काळामध्ये अधिक जोमाने काम करून महाराष्ट्रभर सावता परिषदेचे संघटन करून कल्याण आखाडे साहेबांचं विचार व विश्वासाला तडा जाऊ देणार नाही सावता परिषदेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार असल्याचे म्हणाले.