
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा- सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीची रक्कम व पिक विम्याची रक्कम लवकरात लवकर खात्यात वर्ग करा राष्ट्रवादी कॉग्रेसचे जालना जिल्हा उपाध्यक्ष कैलास सरकटे यांनी माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार याच्या वाढदिवसाचे औचित्ते साधून जिल्हाअधिकाऱ्यास दिले निवेदन. निवेदनात असे म्हटले
कि मंठा तालुक्यात खरीप हंगाम 2022 मध्ये संतत धार पाऊस व अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप च्या पिकाचे अतोनात नुकसान झाले होते तरी वारंवार निवेदन देऊन सुद्धा खरीप च्या पिकाचे नुकसानाची रक्कम आज पर्यंतही मिळालेली नाही. महाराष्ट्र शासनाकडून मंठा तालुका हा दुष्काळग्रस्त मंजूर करण्यात आलेलाही होता तरी देखील रक्कम आजपर्यंत मिळाली नाही. तसेच पिक विम्याचा दुसरा हप्ता सुद्धा मिळालेला नाही. व कुठल्या पिकासाठी विमा रक्कम हि किती आली यात देखील शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आहे तरी यात साहेबानी संबंधित पिकविमा कंपनी कडून कुठल्या पिकासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली याची यादी घेऊन, तालुक्यातील शेतकऱ्या पर्यंत पोहचवावी. साहेबांनी यात लक्ष घालून लवकरात लवकर या दोन्ही रकमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात याव्या निवेदणावर कैलास सरकटे,प्रवीण सरकटे, सचिन खवणे इत्यादीच्या स्वाक्षऱ्या होत्या.