
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
आ.निलेश लंके यांची विशेष उपस्थिती
जव्हार:-आपले मानवाधिकार फाउंडेशनच्या ३ ऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात काम करणाऱ्या युवा सामर्थ्य प्रतिष्ठानच्या कार्याची दखल घेऊन मानाच्या ‘सेवारत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.अहमदनगर जिल्ह्यातील पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कर्मभूमी असलेल्या राळेगणसिद्धी येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय तिसरे एक दिवसीय अधिवेशन आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडले.देशातील तेरा राज्यात काम करणाऱ्या आपले मानवाधिकार फाउंडेशनने जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून या अधिवेशनादरम्यान आपले अधिवेशन,दिनदर्शिका प्रकाशन व विविध पुरस्कारांचे वितरण अशी तिहेरी भूमिका साकारून पार पाडले.
या अधिवेशनात समाजातील तळागाळात शेवटच्या घटकापर्यंत काम करणाऱ्या नामवंत व्यक्ती,सामाजिक संस्थांचा सन्मान करण्यात आला असून या पुरस्कारांमध्ये सेवारत्न पुरस्कार,सेवाभूषण पुरस्कार,कलारत्न पुरस्कार,नारीशक्ती पुरस्कार व आरोग्यदूत पुरस्कार अशा प्रकारचे पुरस्कार देऊन अनेकांचा सन्मान करण्यात आला विशेष म्हणजे आमदार निलेश लंके यांनी या अधिवेशनाला आपली हजेरी लावून आपले मानवाधिकार फाउंडेशनचे कार्य हे विश्वासनीय व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणारे असून पुरस्कारार्थींना मिळालेल्या सन्मानाने ते अजून प्रोत्साहनाने काम करतील असे गौरोउद्गार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
या राज्यस्तरीय अधिवेशनात राज्यातून अनेक जिल्ह्यांमधून फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित झाले होते.समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या आपले मानवाधिकार फाउंडेशनचे संचालक डॉ.दिपेश पष्टे यांची उपस्थितीही या अधिवेशनात लक्षणीय ठरली.दरम्यान या राज्यस्तरीय तिसऱ्या अधिवेशनात फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेश पष्टे,सहसंचालक प्रफुल भटकर,सेवा समिती अध्यक्ष शंकर आप्पा जाधव,राज्य अध्यक्ष डॉ.गणेश उमराठकर,सचिव रेणुका दिघे तसेच युवा समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष मुकेश वातास व इतर पदाधिकारी व सदस्य या अधिवेशनात सहभागी झाले होते.