
दैनिक चालू वार्ता हातकणंगले प्रतिनीधी- कवि सरकार
इंगळी येथील ग्राम पंचायत निवडणूकीत सत्ताधारी व विरोधी गट या चालू ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी एकत्रीत येऊन आघाडी केली आहे.
सध्या गावात निवडणूकांच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असून गावातील दोन मोठे गट एकत्रीत येऊन
इंगळेश्वर ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातुन प्रचारात आघाडी घेतली आहे.सध्या गावातून सरपंच निवड होणार असलेने सरपंच पदांसाठी मागासवर्गीय आरक्षण असलेने ४ उमेदवार रिंगणात उभे आहेत.
इंगळीत लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार दादासो धोंडीबा मोरे यांनी प्रचार दरम्यान इंगळेश्वर ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून इंगळी गाव आदर्श बनवणे हेच ध्येय असलेचे सांगितले. गेल्या ५ वर्षात या आघाडीच्या माध्यमातुन अनेक विकास कामे मार्गी लावलेने सर्व सामान्य मतदारांचा कौल इंगळेश्वर ग्राम विकास आघाडी यांच्या बाजूने दिसून येत आहे . गावात गेल्या५वर्षात जिल्हा परिषद,सद्स्य,पं.स.सदस्य,यांच्या फंडातून तसेच इतर वेगवेगळ्या शासनाच्या योजनेमधून गावातील रस्ते,पाणीपूवठा,दिवाबत्ती,पेवि्ंगबॅल्क.बसवले असून गावाची सुधारणा केली आहे.पुन्हा गावातील प्रश्न मार्गी लावून गावला आदर्श बनवण्याचा मानस असलेचे सांगितले आहे. गावात सहकारी संस्था,सोसायट्या,पत स्ंस्था,दूध,संस्था,त्या माध्यमातून नागरीकांना स्वांवलंबी बनवणे,रोजगार हमी योजनेतून मजूरांना काम देणे,शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठी आघाडीचा प्रर्यत्न राहाणार असलेचे सांगितले आहेत सध्या गावात इंगळेश्वर ग्रामविकास आघाडीचा प्रचार यंत्रणा हायटेक करून संपुर्ण गावात त्यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे गावात वातावरण इंगळेश्वर ग्रामविकास आघाडीची प्रचारात घोडदौड मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे सध्या शेतीची कामे सुरू असूंन तसेच ऊस तोडणीचा हंगाम असलेने शेतकरी वर्ग शेतात असलेने त्यांना व रानामाळात असणाऱ्या वसाहती मध्ये जाऊन प्रचार मंत्रणा राबवली जात असून मतदार सुद्धा आघाडीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद देत असलेचे दिसून येते.आघाडीचे प्रमुख माजी सरपंच रावसाहेब पाटील,माजी सरपंच बाबुराव पाटील,जंब्बूकुमार देसाई,माजी सरपंच फिरोज नायकवडी,बाळासाहेब कोळी (नेते),शांतीनाथ चौगुले,प्रकाश खुडे,यांच्या नेतृत्वात इंगळेश्वर ग्रामविकास आघाडीची जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात आहे.