
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
—————-——————————————-
दिनांक (12 डिसेंबर): अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेंन्शन योजना लागू करावी, अनुदान टप्पावाढीचा शासनादेश ताबडतोब निर्गमीत करावा या व इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वीस डिसेंबर रोजी मराठवाडा शिक्षक संघ घटक असलेले महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ नागपूर येथे धरणे आंदोलनकरणार असल्याची माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम यांनी दिली.
य बाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्याचा शिक्षण विभाग प्रश्न ग्रस्त बनला आहे. राज्याच्या महान शैक्षणिक वारशाने शरमेने खाली मान घालावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिक्षण आणि शिक्षकांवर दररोज नवनवे हल्ले केले जात आहेत. म्हणून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाने वीस डिसेंबर रोजी विधान भवना समोर धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. महामंडळाचे अध्यक्ष माजी शिक्षक आमदार विश्वनाथ डायगव्हाणे आणि सरचिटणीस व्ही. जी. पवार यांनी या बाबत शासनास निवेदन पाठवले आहे. त्यामधे म्हटले आहे की, नवीन परिभाषित अंशदायी पेंन्शन योजना अतिशय कुचकामी असल्याने ती रद्द करून सर्वांनाच जुनी पेंन्शन योजना लागू करावी ही राज्यातील शिक्षक, शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांची भावना आहे. मराठवाडा शिक्षक संघाचे मराठवाडाभर भव्य धडक मोर्चे आणि शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली आझम मैदान मुंबई येथील आंदोलनामुळे अनुदान टप्पावाढीची घोषणा करण्यात आली परंतु अद्याप पर्यंत त्याबाबतचा शासनादेश निर्गमीत करण्यात आलेला नाही, शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी, विनाअनुदाना वरून अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली करण्या वरील स्थगिती उठवावी, वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा, शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांची रिक्त पदे तात्काळ भरावीत, सातव्या वेतन आयोगा प्रमाणे वेतनेत्तर अनुदान द्यावे, या व इतर मागण्यांसाठी वीस डिसेंबरच्या धरणे आंदोलनात प्रचंड संख्येने सहभागी होऊन राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी आपला तीव्र असंतोष आणि नाराजी प्रकट करावी असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष माजी शिक्षक आमदार विश्वनाथ डायगव्हाणे, सरचिटणीस व्ही जी पवार, मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक तथा माजी विभागीय अध्यक्ष पी. एस. घाडगे, विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम,सहसचिव सौ.रेखा सोळूंके ,जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार ,सचिव रविद्र वाकोडे ,के.का.स.जी.पी.कौसल्ये ,ई.डी.पाटोदेकर ,जिल्हाकार्याध्यक्ष बी.डी.जाधव ,कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील ,सहसचिव आर.पी.वाघमारे ,रायकोड नागोराव ,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.विजयालक्ष्मी स्वामी ,उत्तम लाठकर ,शहराध्यक्ष डी.बी.नाईक ,सचिव बी.एम.टिमकीकर ,कार्याध्यक्ष राजेश कदम,जिल्हाउपाध्यक्ष गणेश बडूरे ,आनंद मोरे,एम.एस.मठपती ,क्लायमेंट अल्डा,हाळदे माणिक ,शिवराज कदम,आर.पी.ब्याळे,अनिल सुगावकर,संजय केंद्रे ,संभाजी पाटील बुडे,वडवळे,शिवानंद स्वामी,विनोद पाटील भुताळे ,रणखांब सर,प्रा.कर्णे ,किशन केंद्रे ,गणेश कळसकर,प्रज्ञा सांगवीकर यांच्यासह जिल्यातील सर्व पदाधिका-यांनी केले आहे.