
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
दिनांक १२ डिसेंबर २०२२
येथील एस व्ही ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन व प्रसिद्ध उद्योजक डॉ.श्री . मनोज कदम यांना दिल्ली येथील युनिव्हर्सिटी ने त्यांच्या उद्योजकता विकास, औद्योगिक प्रकल्प आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांतील भरीव आणि विशेष योगदानाबद्दल दखल घेऊन मानद डॉक्टरेट देऊन दिल्ली येथे प्रतिष्ठित व्यक्तीच्या उपस्थितीत दिनांक ९ डिसेंबर २०२२ रोजी कार्यक्रमात सन्मानित केले . अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून आणि मेहनतीने पुढे जाऊन स्वतःचे वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यवसाय मोठे करत अतानाच सोबत तरुणांना उद्योजक बनवून यशस्वी मोठे करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. सोलापूर जिल्ह्यातील खेड्यातील गरीब शेतकरी कुटुंबात जन्म , लहानपणासूनच नेहमी वर्गात प्रथम क्रमांक मिळवत त्यांनी आपले शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण , महाविद्यालयीन शिक्षण सोलापूर मधील दयानंद महाविद्यालय आणि इंजिनिअरिंग चे शिक्षण शैक्षणिक कर्ज घेऊन श्री तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय वारणानगर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून आणि पदवित्तर शिक्षण पुणे युनिव्हर्सिटी , तसेच एम टेक केमिकल (ड्रग्स अँड फार्मासुटिकल्स ) UDCT येथून तर MBA (Project Management) व MBA (International Business management) पुणे येथून पूर्ण केले . दोनीही युनिव्हर्सिटीमधींल गोल्ड मेडलिस्ट म्हणून चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आणि आपल्या कर्तृत्वाने , कामावरील चिकाटीनं त्यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी एका मोठ्या अमेरिकन कंपनीचा जनरल मॅनेजर म्हणून काम करण्याची संधी मिळाली . त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महत्वाच्या पदांवर काम केले . ९ वर्षांपूर्वी लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून व विदेशात जाण्याची विनंती धुडकावून आपल्या देशासाठी काही करण्याच्या एकमेव ध्यासाने ते भारतातच राहिले आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करून उत्कृष्ट प्रकल्प (Projects) उभारणीसाठी कन्सल्टन्सी हा व्यवसाय आणि सोबत समाजसेवा शेकडो लोकांना रोजगार आणि त्यांनी अनेक प्रकल्प त्यांच्या एस.व्ही इंजिनिअरिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हीसेस च्या माध्यमातून उभे केले आहेत. त्यांचे या उद्योगाचे कन्सल्टन्सी चे अनेक भारतीय व परदेशी नामांकीत कंपन्या आहेत तसेच ज्यांच्याकडून आपण भारतीय आणि सर्व जगच उच्च तंत्रज्ञान घेते त्या जर्मनी ,जपानच्या प्रतिष्ठीत उद्योजकांचे मोठे प्रोजेक्ट त्यांनी यशस्वीरित्या त्यांच्या निकषांपेक्षाही उत्तमरित्या डिझाईन करून पूर्ण केलेले आहेत , हा खर म्हणजे त्यांचा नव्हे तर भारतीयांचा सन्मान आहे, असे इंजिनिअर आणि कन्सल्टंट उद्योजक डॉ. मनोज कदम हे समजतात. त्यांच देशप्रेम , समाजासाठी उद्योग व्यवसाय उभारणीसाठी तरुणांना मार्गदर्शन , गोरगरीब मुलामुलींचे विद्यार्थ्यांचे शिक्षणाची जबाबदारी , रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्रदूषण नियंत्रण, ऊर्जा बचत आणि इतर सामाजिक कार्यात मोठे योगदान ही देखील एक दखल घेण्याजोगी गोष्ट आहे. त्यांच्याकडे गेलेला माणूस कधीच रिकाम्या हाताने येत नाही म्हणून तरुण त्यांना उत्तम संवेदनशील उद्योजक घडविणारे चालते बोलते विद्यापीठच समजतात.
या सर्व कार्याची दखल घेऊन तरुण उद्योजकांसाठी भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने पहिलांयांदाच सुरु केलेला राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार मनोज कदमयांना जानेवारी २०१७ मध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व राजीव प्रताप रुडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच त्याना लगेच दुसरा राष्ट्रीय पुरस्कार “राजीव गांधी एक्ससिल्लेन्स अवॉर्ड २०१७ – उद्योजक घडवणारा उद्योजक” ९सप्टें २०१७ रोजी दिल्लीच्या मज मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित यांनी देऊन सन्मानित केले आहे .
त्यांच्या या सर्व उत्कृष्ट कामाची दखल घेऊन २१ पेक्षा जास्त राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून त्यांच्या नावे ” कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पुरस्कार” मिळवणारा उद्योजक म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड रेकॉर्ड झाले आहे
श्री मनोज यांनी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा वापर व्हावा आणि शेंद्रीय शेतीचा अवलंब करुन “सधन अन्नदाता, विषमुक्त शेती, रोगमुक्त भारत” हा उद्देश समोर ठेवून गंगापूरजवळ १० एकर जागेवर तसेच टेंभुर्णी एमआयडीसी सोलापूर येथे एस.व्ही.ए.एम अॅग्रोफुडेक्स प्रा. लि. ह्या अन्नप्रक्रिया उद्योगाची स्थापना केली असून कंपनीच्या उभारणीला सुरुवात होईल , तसेच एम आय डी सी टेंभूर्णी सोलापूर येथे कंपनी उभारणी सुरु आहे.
याव्यतिरिक्त मनोरंजनातून समाज प्रबोधन हे ध्येय समोर ठेऊन सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्ती सुद्धा चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे आणि आपल्या समाजातील कलाकारांना संधी देण्यासाठी कार्य करत आहेत , लवकरच त्यांचा ग्लोबल आडगाव नावाचा ६०० पेक्षा जास्त कलाकार असणारा जबरदस्त मराठी चित्रपट आपल्या समोर लवकरच येत आहे .
असे वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात आपले नावलौकिक संपादन यशस्वी उद्योजक असणारे सर्वसामान्य वाटणारे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे उद्योजक मनोज कदम . त्यांचे उद्योजकता विकास, औद्योगिक , प्रदूषण नियंत्रण, ऊर्जाबचतआणि सामाजिक कार्य यातील विशेष योगदान पाहून त्यांना दिल्ली येतील आर्ट अँड मॅजिक युनिव्हर्सिटी तर्फे उद्योजक घडविणारे उद्योजक डॉ मनोज कदम “मानद डॉक्टरेट” देऊन सन्मानित करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या . हा सन्मान मिळाला म्हणून त्यांचे श्री व्यंकट मैलापुरे , उद्योजक अमृत मराठे ,डॉ अनिल साळवे, जाधव सर, गायकवाड सर व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक आणि अभिनंदन केले .यामुळे आमची जबाबदारी अजून जास्त वाढली असून पुढील कार्यास प्रेरणा मिळाली आहे असे मत डॉ.मनोज कदम यांनी व्यक्त केले. हा सन्मान मिळाल्याबद्दल मनोज कदम यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे