
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर शहरातील एका झाडाखाली तिरट नावाचा जुगार सुरू होता. या ठिकाणी देगलूर पोलीसांनी कारवाई करून सहा जुगाऱ्यांना अटक केली. जुगार अड्डयावरून १४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
देगलूर शहराच्या बाजूच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोहन माच्छरे यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक रवी मुंडे यांना त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मुंडे यांनी आपले सहकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जुगार अड्डयावर कारवाई केल यावेळी संतोष नागनाथ गुडलावार (क ३६), शादुल सलीम शेख (वय ३६), सती सुरेश कांबळे (वय २४), फुलाजी नागना सावित्रावार (वय ३३), नयूम शेख मोईन (३३) (सर्व राहणार आनंदनगर भायेगाव देगलूर) आणि सागर गिरीधर पुलचुवाड (क २६) (रा. शारदानगर देगलूर) यांना अट केली. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा १३ हजार ७८० रुपया ऐवज जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक र मुंडे यांच्या फिर्यादीवरून सहा जुगाऱ्यांविरु देगलूर पोलीस ठाण्यात जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.