
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
बाळासाहेबांची शिवसेना नांदेड दक्षिण ( लोहा – कंधार, सोनखेड ) उपजिल्हा प्रमुखपदी मारोती एजगे यांची मुंबई येथे शिवसेना सचिव संजय मोरे, संपर्कप्रमुख आनंद जाधव, जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंढारकर, सहसंपर्कप्रमुख गंगाधर बडूरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
यावेळी नवनियुक्त उपजिल्हा प्रमुख मारोती पंढरे, लोहा तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार, कंधार तालुकाप्रमुख धनराज लुंगारे यांची उपस्थिती होती. ग्रामीण भागामध्ये बाळासाहेबांची शिवसेना मजबूत करण्यासाठी पेनूर येथील सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे युवानेते मारोती एजगे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना उपनेते तथा हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या आदेशावरून मारोती एजगे यांची उपजिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
या निवडी बद्दल मारोती एजगे यांनी शिवसेना उपनेते तथा खासदार हेमंत भाऊ पाटील, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर यांची भेट घेऊन आभार मानले आहे.
उपजिल्हा प्रमुख पदी निवडीबद्दल मारोती एजगे यांचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, शिवसेना उपनेते खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, सहसंपर्कप्रमुख गंगाधर बडूरे, सहसंपर्कप्रमुख आकाश रेड्डी, उपजिल्हा प्रमुख मारोती पंढरे, तालुकाप्रमुख मिलिंद पवार, कंधार तालुकाप्रमुख धनराज लुंगारे, मुखेड तालुकाप्रमुख बालाजी पाटील कबनूरकर, नांदेड दक्षिण तालुकाप्रमुख उद्धवराव पाटील शिंदे, नांदेड दक्षिण शहरप्रमुख तुलजेस यादव, लोहा शहरप्रमुख माजी नगरसेवक युवराज वाघमारे, माजी सरपंच सुदाम पाटील बुद्रुक, तालुका संघटक प्रभाकर राऊत, शिवसेनिक श्याम पाटील वानखडे, संभाजी पाटील पावडे, कपिल किरवले, पांडुरंग येवले आदींनी मारोती एजगे यांचे अभिनंदन केले आहे.
*ग्रामीण भागात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संघटन वाढवणार*-उपजिल्हाप्रमुख मारोती एजगे
माझ्यासारख्या सर्व सामान्य कुटुंबातील तरुणांला नांदेड उपजिल्हाप्रमुख पदी निवड करून माझ्यावर जो वरिष्ठांनी विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासात पात्र ठरून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या सरकारच्या योजनाचा ग्रामीण भागात जास्तीत नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ग्रामीण भागातील संघटन मोठ्या प्रमाणात वाढवणार असल्याचे नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख मारोती एजगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.