
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कलंबर :- कंधार व लोहा तालुक्याच्या मध्यवर्ती नांदेड ठिकाणी बिदर रोडच्या बाजूला निसर्गाच्या सानिध्यात श्री.संत योगीराज निवृत्ती महाराज व श्री संत मोतीराम महाराज संस्थान कलंबर खुर्द यांच्या वतीने भव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दिनांक १७ डिसेंबर सकाळी ९ वाजता शोभायात्रा , दुपारी २ वाजता बाईलेकींचा सत्कार सोहळा, सायंकाळी ६ वाजता श्री. संत योगीराज निवृत्ती महाराज व श्री संत मोतीराम महाराज यांच्या ग्रंथकार वै.शंकर महाराज घोरबांड ग्रंथाचे सामुहिक पारायण सोहळा प्रमुख ह भ.प. एकनाथ महाराज उम्रज संस्थान, श्री.गुरू गयबी नागेंद्र महाराज पानभोसी संस्थान, रविवार दिनांक १८ डिसेंबर पहाटे ३ ते ५ होमहवन नऊ ग्रहांची पुजा सकाळी ९ ते १२ बारा मूर्ती व कलश प्राणप्रतिष्ठा सोहळा मुख्य उपस्थिती ह.भ.प.बापुसाहेब महाराज देहूकर ,ह.भ.प.मन्ना महाराज, त्यानंतर भव्य आतिषबाजी दुपारी १ ते ३ ह.भ.प.बापुसाहेब महाराज देहूकर श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज यांचे किर्तन होईल.दुपारी ३ ते ४ महाआरती दुपारी ठीक ४ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख उपस्थिती माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब , श्री.बंडू भाऊ जाधव साहेब खासदार परभणी , श्री सुधाकररावजी शृंगारे खासदार लातूर ,श्री हेमंत भाऊ पाटील खासदार हिंगोली,श्री शामसुंदर शिंदे साहेब आमदार कंधार लोहा, श्री. बालाजीराव कल्याणकर साहेब आमदार नांदेड, श्री मोहन अण्णा हंबर्डे साहेब आमदार नांदेड ,श्री अमर भाऊ राजूरकर आमदार नांदेड,श्री रत्नाकर गुट्टे साहेब आमदार गंगाखेड ,मा.डाॅ. ज्योतीताई विनायकराव मेटे विभागीय सहनिबंधक,प्रा.मनोहर धोंडे शिवसेना नेते, श्री.मुक्तेश्वर धोंडगे साहेब शिवसेना नेते, श्री.रोहीदास चव्हाण साहेब माजी आमदार, श्री.माधवराव पावडे शिवसेना नांदेड जिल्हाध्यक्ष, श्री.शिवा भाऊ नरंगले नांदेड जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, श्री.एकनाथराव पवार भाजपा नेते, श्री.बालाजीराव पांडागळे तालुका अध्यक्ष काॅग्रेस कमिटी कंधार,सौ.लक्ष्मीबाई व्यंकटराव घोरबांड माजी सभापती कंधार, श्री.रामेश्वर तोष्णीवाल सेवा समिती नांदेड, श्री.आनंद काबरा सेवा समिती नांदेड यांची उपस्थिती लाभणार आहे स्थळ:- वैष्णवधाम तिर्थस्थळ कलंबर खुर्द ता.लोहा सहकार्य :- कलंबर बु.कलंबर खुर्द ,लाठ बु. लाठ खुर्द, गुंडेवाडी ,सगूचीवाडी भोपळवाडी ,मोकळेवाडी, पांगरा वंजारवाडी खुडेवाडी, मंगल सांगवी हे सर्व गावे सहकार्य करणार आहेत.तेंव्हा सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सहभागी व्हावे आणि महाप्रसाद घ्यावा असे आवाहन वैष्णवधाम संस्थान व समस्त गावकरी मंडळी कलंबर खुर्द यांच्या वतीने करण्यात आले आहे.