
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा शहरासाठी ३५कोटीज्ञरुपयांचा बाॅयपास टू बाॅयपास रस्ता मंजुरी म्हणजे बनवाबनवी २ पार्ट आहे अशी टीका काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांनी यांनी लोहा येथे पत्रकारांशी बोलताना केली आहे.
लोहा शहरातून बाॅयपास टू बाॅयपास या रस्त्यसाठी खा. चिखलीकरांनी ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशा अनेक वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या आहेत.पंरतु खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे नांदेड लोकसभेचे खासदार आहेत. लोहा शहर व लोहा मतदार संघ हा त्यांच्या नांदेड मतदार संघात येत नाही. लोहा मतदार संघ हा लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये येतो. लोहा शहरातून ३६१ हा राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट रस्त्याच्या कामासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी बाॅयपास टू बाॅयपास मंजूर हा तेव्हाच झाला आहे नागपूर ते बोरीबुटी या ३६१ राष्ट्रीय महामार्गाचे काम केंद्राच्या माध्यमातून चालू आहे उदा.हदगाव, अर्धापूर, उमरखेड, आदी ठिकाणी असा रस्ता मंजूर अंदाजपत्रकातच मंजूर आहे.
पंरतू खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे स्वतः च आपली पाठ थोपटून घेत आहेत त्यांनी मागील चार वर्षांच्या काळात कोणताच प्रोजेक्ट आणला हे काम केंद्रीय रस्ते वाहतूक व विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केले आहे. केंद्रीय मंत्री मोठे की, खासदार मोठे हे त्यांनी सांगावे व बडेपणा मारुन मी ३५कोटी रुपयांचा बाॅयपास टू बाॅयपास मंजूर केला आहे असे सांगत आहेत ही साफ बनवाबनवी पार्ट २ आहे. लोहा शहरातून हा राष्ट्रीय महामार्ग गेला असुन या रस्त्यावरील खड्डे मुरुमाने भरले होते त्यामुळे शहरात धुळच – धुळ होत आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तेव्हा या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंता यांनी लक्ष देऊन गुतेदारांने दररोज पाणी टाकायला पाहिजे होते व लोहा शहर धुळ मुक्त करायला पाहिजे होते . तसेच बैल बाजाराच्या बाजूला खरेदी – विक्री संघाच्या जिंनिग फॅक्टरी च्या मैदानावर झालेल्या सभेत केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी हा रस्ता मंजूर झाले असल्याचे सांगितले मग हा रस्ता आता कसा मंजूर झाला आहे असा सवाल शरद पाटील पवार यांनी केला आहे.
यावेळी जेष्ठ गंगाधरराव महाबळे, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, शाम पाटील नळगे, माजी सैनिक व्यंकट घोडके,सतार भाई आदी उपस्थित होते.