
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा येथील सुप्रसिध्द आयुर्वेदाचार्य डॉ. दिनेश राठोड यांच्या राजाश्रय आयुर्वेद रुग्णालय येथे पंचकर्म महर्षी गुरुवर्य कै. वैद्यराज प्र.ता.जोशी (नाना) धुळे यांच्या स्मरणार्थ दि. २९-१२-२०२२ रोजी मोफत आयुर्वेद पंचकर्म शिबिर संपन्न झाले.
यावेळी प्रभा आयुर्वेद रथयात्रेचे कै. वैद्यराज नाना जोशी यांच्या स्मृती प्रित्यार्थ आगमन झाले. यावेळी जवळपास १०० रुग्णावर आयुर्वेद औषधौपचार करण्यात आले. रुग्णांना मोफत १० दिवसाचे औषधोपचार, अग्नीकर्म, पंचकर्म, करण्यात आले. शिबीरात तज्ञ वैद्य दत्तात्रय दगडगावे, वैद्य विश्वाभंर पवार सर, वैद्य नरहरी सुरनर सर, वैद्य सायली कदम मॅडम, वैद्य देवकते सर, यांनी रुग्णावर उपचार केले.
सदरील शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. दिनेश राठोड, डॉ. लोहारे, डॉ.गाडेकर , एन बी कदम, अतिवीर राजमाने, ऋषिकेश मेडीकलचे लक्ष्मण पाटील कदम यांनी परिश्रम घेतले.