
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत दारू सोडा दूध प्या या सप्तांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर, संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूर, यशवंत विद्यालय अहमदपूर, रवींद्रनाथ टागोर विद्यालय अहमदपूर, कमला नेहरू विद्यालय अहमदपूर, महात्मा फुले विद्यालय आणि महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर या सर्व विद्यालयाने महाविद्यालयातील मुलांनी आपल्या आपल्या शाळा कॉलेजचे फलक घेऊन दारू सोडा दूध प्या अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमा झाले आणि येथे अहमदपूर मधील समाजसेवक कार्यकर्ते विविध दैनिक चालू वार्ता चे पत्रकार प्राध्यापक शिक्षक वृंद शिवाजी चौकामध्ये प्रारंभीला दूध वाटप करून रॅलीला प्रारंभ करण्यात आला आणि या रॅलीचा समारोप महात्मा फुले महाविद्यालयामध्ये सर्व सामील विद्यार्थ्यांना मुलांना नागरिकांना दूध वाटप करून होणार आहे.
या रॅलीमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालय यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल ग्रामीण विकास लोकसंस्था चे श्री मच्छिंद्र गोजमे,
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य समन्वयक श्री हरिदास कमीवार तालुका अध्यक्ष श्री प्राध्यापक जीवन गंगणे सरचिटणीस पत्रकार बाबासाहेब वाघमारे, एन डी राठोड यांनी सर्वांचे आभार मानले
समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा गांधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कॅप्टन श्रीरंग खिल्लारे सर हे होते. पत्रकार बाबासाहेब वाघमारे, प्राध्यापक जीवन गंगणे, एन डी राठोड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य समन्वयक श्री हरिदास तनिवार सर यांनी विद्यार्थ्यासमोर व्यसनाच्या दुष्परिणाम बाबत मार्गदर्शन केले रॅलीचे समारोप माझी प्राचार्य कॅप्टन सेवन खिलारे सर यांच्या अध्यक्षीय भाषणांनी झाले.