
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:
-आज विद्यानिकेतन प्राथमिक शाळा देगलूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेषात येऊन जयंती साजरी करण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले मत व्यक्त केले व गाणे गायले त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शेख सर सहशिक्षक संतोष मनधरणे . संतोष अजगरे माने मॅडम जाधव मॅडम देगलूरकर सर प्रमोद मोरे व सर्व पालक आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.