
दैनिक चालू वार्ता राजगुरुनगर / प्रतिनिधी : -खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर गुळाणी (ता. खेड) येथे उत्साहात संपन्न झाले. ‘युवकांचा ध्यास : ग्राम-शहर विकास’ अशी संकल्पना असलेल्या शिबिरात सुमारे १७५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
शिबिराच्या उदघाटन प्रसंगी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे, डॉ. एच. एम. जरे, सरपंच इंदुबाई ढेरंगे, उपसरपंच अनिता शिनगारे, ज्ञानेश्वर ढेरंगे, ग्रामसेवक अनिता अमराळे, मुख्याध्यापिका सविता गावडे, उद्योजक ज्ञानेश्वर पिंगळे, यशवंत पिंगळे, सर्जेराव पिंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बुट्टेपाटील यांनी आयुष्य समृध्दपणे जगण्याचे कौशल्य रासेयो शिबिरातून मिळत असून विद्यार्थ्यांनी या शिबिराच्या माध्यमातून जीवनाला नेमकेपणाची दिशा देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
शिबिर काळात स्वयंसेवकांनी गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, लिंगभाव संवेदनशीलता जनजागृती, लोकशाहीतील सहभाग व जनजागृती, जलस्रोत व वृक्षरोपण, प्रधानमंत्री जनधन व विमा योजना, अन्न सुरक्षा जनजागृती, अपारंपारिक ऊर्जा स्रोत, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, महिला सबलीकरण, स्त्री-भ्रूणहत्या, ग्रामीण विकासात ग्रामसभेची भूमिका, आर्थिक स्वावलंबन अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले.
शिबिरातील स्वयंसेवकांना योगेश्वर पाटील, डॉ. महेंद्र गरड, सीए सचिन ढेरंगे, निलेश पिंगळे, डॉ. संजय शिंदे, भूषण सांडभोर यांनी मार्गदर्शन केले.
शिबिराचा समारोप संचालक हिरामण सातकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, रासेयो पुणे जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकांत फुलसुंदर उपस्थित होते. याप्रसंगी सातकर यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, जिद्द, प्रामाणिकपणा, समर्पण आदि गुणांनी आपल्या आयुष्याला आकार द्यावा, असे आवाहन केले.
या शिबिरातील उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून राहुल खुशवाह आणि तनुजा कोहिणकर यांना गौरविण्यात आले.
शिबिराचे आयोजन रासेयो अधिकारी डॉ. गणेश धुमाळ, डॉ. प्रभाकर जगताप, डॉ. कीर्ती नितनवरे यांसह प्रा. अपर्णा कुलकर्णी, प्रा. निलेश बारणे, प्रा. सागर थेऊरकर, प्रा. प्राची शिंदेकर, प्रा. सुरज गारगोटे, प्रा. जयश्री गोगावले, प्रा. कविता वाळुंज, प्रा. अक्षय खुर्पे, प्रा. राजकुमार मुंडे यांनी केले.