
दैनिक चालू वार्ता अंबाजोगाई प्रतिनिधी- बालाजी देशमुख
आज 03 जानेवारी2023 निमित्त सावित्रीबाई फुले यांची जयंती राष्ट्रीय सेवा योजना विभाग, योगेश्वरी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. आर.डी.जोशी हे उपस्थित होते. सर्वप्रथम अध्यक्षांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सारिका संगीकर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. एम.डी. आचार्य यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर.व्ही. कुलकर्णी , अधीक्षक श्री.अजय चौधरी,
विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.