
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
आखिल वंजारी समाजाचे आराध्य दैवत आद्यसंत श्री समर्थ आवजीनाथ महाराज श्री क्षेत्र मिरपुर लोहारे येथे केंद्रिय अर्थ राज्यमंत्री मा ना डाँ श्री भागवतरावजी कराड साहेब प्रथमच श्री आवजीनाथ बाबा मंदिरात दर्शनासाठी व समाजबांधवांच्या भेटीसाठी येत आहे त्या निमित्त त्यांचा सपुर्ण वंजारी समाज व श्री समर्थ आवजीनाथ भक्त परीवाराच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यांत आलेला आहे
तरी त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणुन ना. श्री राधाकृष्ण विखे पा. महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य व श्री बाळासाहेब थोरात मा.महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य.खा डाँ सुजय विखे पा. खासदार अहमदनगर. मा डॉ . श्री सुधिरजी तांबे आमदार पदवीधर मतदार संघ तसेच अहमदनगर ,नाशिक धुळे जालना बिड औरंगाबाद या जिल्ह्यातुन तसेच परजिल्हातुन समाज बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे तरी सर्व समाज बांधव व भक्त परीवार यांनी दि ८ जानेवारी रविवारी दुपारी ४ वाजता श्री संत समर्थ आवजीनाथ महाराज देवस्थान श्री क्षेत्र लोहारे ता. संगमनेर जि. अहमदनगर येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन श्री आवजीनाथ महाराज मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री चंद्रकांत रामभाउ करपे (वंजारी) यांनी केले आहे..