
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
कंधार – कंधारचे नगरसेवक तथा जेष्ठ पत्रकार गणेश कुंटेवार यांना स्वर्गीय माधवराव आंबुलगेकर सामाजिक पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले सह्याद्री ह्या शासकीय विश्रामगृहात ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मीमांसा फाऊंडेशन, मिडीया-पोलीस सोशल क्लब,पत्रकार प्रेस परिषद-भारत,दै.समिक्षा,व्हाईस आॅफ मिडीया,मंथन क्रिएटिव्ह ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दर वर्षी पत्रकारिता पुरस्कार सोहळा संंपादक रूपेश पाडमुख हे आयोजित करतात. पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकांना पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी ही अनेक पत्रकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात दैनिक सामनाचे तालुकाप्रतिनिधी गणेश कुंटेवार यांना स्व.माधव आंबुलगेकर सामाजिक पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले.कुंटेवार ह्यांनी १९९२-९३ पासून दैनिक सामनाचे तालुकाप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. राजकिय व सामाजिक प्रवास करत असतानाही त्यांनी आपले वृत्त लेखन बंद केले नाही.सामाजिक, राजकीय घडामोडी सह त्यांच्या विशेष बातम्याची बर्याच वेळा दखल घेतल्या गेली. यापूर्वी सुध्दा त्यांना उदगिर पत्रकार संघातर्फे उत्कृष्ट पत्रकार म्हणून विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.सन २०२२ च्या पत्रकारिता पुरस्काराचे आयोजक रूपेश पाडमुख व त्यांच्या सहकार्यानी स्व.माधव आंबुलगेकर सामाजिक पत्रकारिता पुरस्काराने कुंटेवार यांना सन्मानित करण्यात आले.
पत्रकार दिनाच्या पुर्वसंध्याला सह्याद्री विश्रामगृह नांदेड येथे आयोजित ह्या कार्यक्रमास डॉ. राजेंद्र पाटील,लायन्स क्लब ऑफ नांदेड मिड टाऊन चे अध्यक्ष प्रेमकुमार फेरवानी,आय आय बी चे संचालक दशरथ पाटील,मुंबईच्या पत्रकार प्रेरणा जंगम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माझ्या सोबत कंधारचे पत्रकार माधव भालेराव (संपादक हिंदवि बाणा ),दिगंबर वाघमारे (संपादक युगसाक्षी ),सिकंदर भाई,भागवत गोरे सर, सुर्यकांत केंदैं यांची उपस्थिती होती.यावेळी गणेश कुंटेवार यांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. ह्या यशाबदल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.