
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी)
देगलूर येथील सिंधू महाविद्यालयात राष्ट्रमाता माॅसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली..यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. भिमराव दिपके म्हणाले की, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचे विचार तरुणांनी अंगीकारावे. माँसाहेब जिजाऊंनी आपल्या कार्यातून एक आदर्श आई, सून आणि मुलगी कशी बनावी, याची शिकवणूक मिळते. असे प्रतिपादन प्रा. दिपके यांनी केले. तर प्रमुख पाहुणे प्रा. मिलिंद राजुरकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अभिनंदन सिताफुले सर यांनी अध्यक्षीय समारोप केले
यावेळी राजूरकर म्हणाले की, तरुणांनी स्वत:चा विकास साधण्यासाठी स्वामीचींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवावे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य. ए. बी. सीताफुले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव अशोक दाचावार, प्रा. मिलिंद राजुरकर होते.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंदन बद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लक्ष्मण वजिरे यांनी केले तर, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पाटिल सर यांनी केले, या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. जाधव सर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.