
दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- तालुक्यात शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर होत असताना अँड्रॉइड मोबाईल म्हणजे एक व्यासनच आजच्या तरुणाईला जडले असल्याचे दिसून येत आहे.मागील काही वर्षांपासून तर अगदी सेवानिवृत्त झालेली व्यक्ती देखील मोबाईलचा वापर करत असताना हेडफोन सर्रास वापरत आहेत जे की आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे.या हेडफोनच्या अतिरेकाचे दुष्परिणाम म्हणजे डोकेदुखी श्रवण क्षमता कमी होणे असे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.येत्या काही वर्षानंतर डोकेदुखी व श्रवण क्षमता तसेच बहिरेपणा असे अनेक रुग्ण वाढन्याची लक्षणे आढळून येत आहेत.
मागील काही वर्षामध्ये मोबाईलसह हेडफोनचा वापर करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.शालेय विद्यार्थी असो किंवा युवा मजूर सगळ्यांकडेच अँड्रॉइड फोन उपलब्ध आहेत.यामुळे हेडफोनचा अतिवापर केल्याचे दुष्परिणामही समोर येत आहेत.विशेषत: सर्दी असताना हेडफोन वापरल्यास त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.त्यामुळे हेडफोन मोठ्या आवाजात वापरणे टाळले पाहिजे.वापरायचे असेल तर विराम घेत घेत अतिशय कमी आवाजात हेडफोन वापरावा.सर्दीपडसे असताना तो न वापरलेलाच बरा.
मोबाईलच्या वाढत्या प्रभावामुळे हेडफोनचा वापरही वाढत आहे.विशेष करून तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात हेडफोन वापरता येते.अलीकडे शाळकरी मुलांमध्ये हेडफोनचा वापर वाढला आहे.विशेषत: मुलांनी हेडफोनच्या अतिवापरापासून लांब राहिले पाहिजे.असे डॉक्टर सांगतात.सर्दी असताना कान बधिर झालेले असतात.अशावेळी मोठ्या आवाजात हेडफोन वापरल्यास दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.तसेही एरवी ७० ते ८० डेसिबलपेक्षा अधिक तीव्रतेने आवाज ऐकल्यास डोके दुखणे,श्रवणक्षमता कमी होण्याची शक्यता असते.त्यामुळे मोबाइलचा अतिवापर विशेषतः हेडफोनचा टाळणेच आरोग्यासाठी लाभदायक आहे.
मोबाईल वापरताना घ्यायची काळजी
रस्त्यावर चालताना,वाहन चालविताना,बागेत फिरताना,जिममध्ये व्यायाम करताना,लॅपटॉपवर काम करताना तरुणांमध्ये हेडफोनचा वापर होताना दिसतो.मात्र कोरोना प्रभावानंतर आता विविध ऑनलाइन क्लासेसमुळे हेडफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
कानाला त्रास
कानामध्ये कोणतीही टोकदार वस्तू घालू किंवा फिरवू नका,परस्पर कानात कोमट तेल,पाणी टाकू नका.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध कानात टाकू नका,सतत कान खाजवत असल्यास बोटे,पेन,पेन्सिल कानात घालणे टाळा.