
दैनिक चालु वार्ता हातकणंगले -कवि सरकार इंगळी
इंगळी गावात जैनधर्मियांची पंचकल्याण महापूजा महोत्सव २७जानेवारी ते ३फेब्रुवारी या आठदिवस चालण्याऱ्या पंचकल्याण पूजेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक लोक येणार असलेने सध्या गावात लाइट ,रस्ते,पाण्याची सोय यासाठी लोक मेहनत घेत आहेत.
गावातील मुख्य प्रवेशद्वारापासून कार्यक्रमाच्या ठिकाणा प्रर्यंत हातकणंगले मतदार संघाचे आमदार राजु बाबा आवळे यांचे फांडातून तातडीने वीस लाख रू.खर्चाच्या डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभाचा आमदार राजूबाबा आवळे व सरपंच दादासो मोरे(बापू) यांचे हस्ते करणेत आला. दादासो मोरे यांनी सरपंचपदाचा कार्यभार स्विकारले नंतर गावात इंगळी चंदूर पानंद रस्ता आणि गावातील मुख्य रस्त्याचे काम तातडीने सुरू झालेने सरपंच मोरे यांचे गावात कौतुक होत आहे. कार्यक्रमात आमदार राजूबाबा आवळे यांनी पंचकल्याण पूजेसाठी शुभेच्छा देऊन गावातील उर्वरीत विकास कामे करण्याचे आश्वासन दिले यावेळी रावसो पाटील जिनेंद्र चौगुले,कवि सरकार इंगळी,भिमराव पाटील,पोपट पाटील,संजय भातमारे,पोपट पोवार,बाबूराव पाटील,उपसरपंच सौ,स्वप्नाली भासणारे ,ग्रा.प.सदस्य,,जितेंद्र ऐतवडे,युवराज चव्हाण,शिवाजी चौगुले,चंद्रकला मगदूम,सुरज बुगटे,इरशाद नायकवडी अनिल भोसले,अमृत वेताळे,मियालाल पटेल, बाळासो नायकवडी, सुनिल भातमारे ,गणेश नाईक,सुरेश नाईक,,पंचकल्याण समिती कार्यक्रर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.