
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी
श्री शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळी ता.देगलूर ची विद्यार्थिनी कु.धनश्री माधवराव भाले ही इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी
“मोबाईल आणि आजची स्थिती” या सोशल मिडियाच्या विषयावर असं कसं जुळलं मोबाईलशी सुत्र…खाली रडते पुत्र अन् खांद्यावर कुत्र अशा आशयाचे
सुंदर व अभ्यासपुर्ण चित्र काढून विचार करायला लावले.आजकाल मोबाईल च्या अति वापरामुळे बिघडत चाललेल्या युवा पिढीला चित्राच्या माध्यमातून सत्य परिस्थितीवर भाष्य करायला लावणारे तिचे चित्र मनाला स्पर्शून गेले.तिच्या यशाबद्दल माजी मुख्यमंत्री मा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत, संस्थाध्यक्ष माजी मंत्री मा.भास्करराव पाटील खतगावकर, मा.आमदार ओमप्रकाश पोखर्णा साहेब,मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव ..मा.बालाजीराव खतगावकर साहेब समाजसेवक मा.कामाजी पवार,साई शिक्षण संस्थेचे सचिव मा.बाळासाहेब पाटील खतगावकर,मा.सुरजित सिंह गिल,डाॅ.सौ.मिनलताई पा.खतगावकर,युवानेते रवि पा.खतगावकर अदी मान्यवरांच्या उपस्थितीत तिला आकर्षक स्मृती चिन्ह पुष्पगुच्छ देऊन तिचे विशेष कौतुक करून सन्मानित करण्यात आले.ती श्री साई शिक्षण प्रसारक मंडळ खतगाव ति बिलोली आयोजित स्व.मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्य आयोजित चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या बोलक्या व उत्कृष्ट चित्रांनी विशेष छाप टाकली. तिचे मार्गदर्शक,कलाध्यापक,बालाजी पेटेकर सर यांचे तिला मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक,सुरेश वनंजे,राजेश बामणे,आनंद दिमलवाड,धनाजी पा. मोरे,माधव कदम,दिगंबर खिसे,कलाध्यापक बालाजी पेटेकर,सौ अंजली देशमुख,श्री बालाजी बारडवार,दिलीप पाटील व अंकमवार मामा व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी तिचे कौतुक केले.तिच्या यशाबद्दल वनाळी व वनाळी परिसरातील पालकातून विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ साहित्यिक दिगंबर कदम, व प्रा.पांचाळ यांनी केले.