
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
…मंठा…मागील काळात शेतशिवारात लाकडी डिळी, डहाळे फांदयाचा मांडव अनेक शेतकरी घालत असायचे. त्यामध्ये गाई, म्हशी, शेळ्या बांधून शेतात शेणखत घालायचे. परंतू आता शेतीव्यवसायावर आधुनिकरणाचा पगडा बसल्याने पूर्वीच्या मांडव व मळा कालबाह्य झाल्याचे दिसू लागले आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने फार प्राचिन काळापासून भारतात शेती व्यवसाय केला जातो. परंतू त्या काळातील शेती व्यवसायाचे स्वरुपही आता पूर्णपणे बदलेले दिसून येत आहे. पूर्वी शेतात जो अनुभव यायचा तो आजच्या आधुनिक युगात दुरापास्त झालेला दिसत आहे.
30 वर्षापूर्वी तालुक्यात ज्वारीचे पिक अनेक शेतकरी घेत असायचे. जानेवारी, फेब्रुवारी महिना झाल्यानंतर हिरवेगार ज्वारीचे पिक वाऱ्यावर डुलणारे हुरड्याचे कणस खुलून दिसत असायचे त्याच पक्षी प्राण्यापासून रक्षण करण्यासाठी मळा केला जायचा त्यावर उभे राहून हातात गोफन असायची.गावात शहरामधील कुणीही पाहुणा आला तर त्याला त्या ज्वारीच्या हुरड्याची मेजवाणी दिल्याशिवाय ग्रामिण भागातील शेतकरी राहत नव्हता हुरड्या सोबत शेंगदाण्याने मिर्ची पाट्यावर वाटून चटणी असायची गव्हाच्या ओंब्या सोबत गावरान गूळ परंतू आधुनिककरणात हे सर्व बदलत चालले आहे. कधीकाळी शेतातून निघणाऱ्या धान्याचे बैलाव्दारे मळण करणे हा सर्व प्रकार त्या काळात सुरु होता. त्यानंतर त्याची जागा मळनियंत्र व ट्रॅक्टरने घेतली. आतातर तर आधुनिक काळात ज्वारीची लागवड करणेही जवळपास बंद झाले आहे. त्याबरोबरच आता गव्हाच्या कापणीसाठी हार्वेस्टर हे यंत्र आले आहे. चट मंगनी पट विवाह याबरोबरच कापणीला आलेला गहू एका दिवसातच विक्रीसाठी तयार होत आहेत. एवढा आधुनिकतेचा पगडा शेती व्यवसाय झाला आहे. पूर्वीच्या काळात धान्य काढण्यासाठी पंधरा दिवस लागायचे. अगोदर शेतशिवारात खळे तयार करण्यात येत. त्यावर पाणि शेणाचे सारवण धुमस करुन शेतात कापलेले कोणतेही पिक मळण करण्यासाठी खळ्यात टाकायचे.उधळण्यासाठी टिव्हा असे.तुरीचे खळे करताना खळ्या भोवती तुरीच्या पेंढ्याचे मंडळ उभे करायचे मधात लाकडी फाळ्यावर पेंढ्या बडवायचे खळे चालु आसतांना तुरीच्या घुगऱ्या करायचे आज ह्या गोष्टी इतिहासजमा झाल्या आहेत.