दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
गोणार :- कंधार तालुक्यातील गोणार येथे पिरसाहेब उरूस (यात्रेनिमित्त) प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी
दि.१९/०१/२०२३रोज गुरुवार पासून पिरसाहेबांचा ऊरुस (यात्रा ) सुरुवात होत असुन यात्रे निमित्य पुढील प्रमाणे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.
दि.१९/०१/२०२३ रोज गुरुवारी रात्री संदल ऊरुस
दि.२०/०१/२०२३रोज शुक्रवारी कंदो-याचा कार्यक्रम
दि.२१/०१/२०२३रोज शनिवारी जंगी कुस्त्यांचे आयोजन केले आहे.
दि.२०/०१/२०२३ रोजी व दि.२१/०१/२०२३ रोजी नियोजित लोकनाट्य तमासा मंडळाचा कार्यक्रम होईल.
या शिवाय नाचतमाशा मंडळाचा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तसेच गोणार येथील यात्रेस सर्व व्यापा-यांना प्रोत्साहान देऊन सन्मान केला जाणार आहे.व्यापार्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे तसेच सर्व भाविक भक्तांनी या उरुस (यात्रेचा)आवश्य लाभ घ्यावा अशी नम्र विनंती यात्रा कमिटी व समस्त गांवकरी मंडळी
मौ.गोणार ता.कंधार यांनी केली आहे.हिंदु व मुस्लिम समाजातील एकोप्याचे दर्शन गोणार येथे पिरसाहेब उरूसाच्या निमित्ताने पहायला मिळते.


