दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर बिलोली तालुक्यामध्ये मकर संक्रात सण आज उत्सवात साजरी करण्यात आले इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की, मराठी सणांनाही सुरुवात होते. सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत (makar sankranti in marathi). दरवर्षी जानेवारीच्या 14 तारखेला संक्रांत हा सण साजरा करण्यात येतो. पण यावर्षी 15 जानेवारीला साजरा करण्यात येत आहे. पण असं फार क्वचित घडतं. या दिवशी सर्व शेतकरी आपल्या शेतामध्ये सकाळी लवकर शेतात जाऊन सर्व घरातील मंडळी व पाहुणेरावळे मित्रमंडळी यांना शेतात बोलवून शेतामध्ये जेवू घालतात एकमेकाला तिळगुळ देऊन मकर संक्रांतीचे शुभेच्छा देतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला भारता मध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये मात्र मकर संक्रांत म्हणूनच हा दिन साजरा होतो. खरं तर मकर संक्रांतीला अध्यात्मिक जितकं महत्त्व आहे, तितकंच शास्त्रीय महत्त्वही आहे. हा दिवस येण्याआधी रात्र मोठी असते तर दिवस लहान असतो. मात्र या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात. शिवाय संक्रांतीनंतर ऋतूबदल होत थंडी कमी होऊ लागते. पण सर्वात महत्त्व असतं ते या दिवशी तिळाला. तीळ इतके महत्त्वाचे का? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण पूर्वी प्रचंड प्रमाणात थंडी असायची आणि तिळामुळे शरीर उष्ण राहते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ खाण्याची पद्धत सुरु झाली. त्यातूनच तिळाचे लाडू आणि विविध पदार्थ बनण्यास सुरुवात झाली.


