दैनिक चालु वार्ता नांदेड उपसंपादक -गोविंद पवार
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका हा सतत जिल्हाभरात विविध कारणाने चर्चेत असतो याच लोहा तालुक्यामधून बुटी बोरी ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 चे काम प्रगतीपथावर चालु असुन सदरील महामार्ग क्रमांक 361 काम करण्यासाठी लागणारे मुरूम, गिट्टीसाठी आतापर्यंत ठेकेदाराने रॉयल्टी किती ब्रास ची भरलेली आहे तसेच दिनांक 11-1120021 ते 11-11-2022 या कालावधीत किती शेतकऱ्यांनी माती विकली व तालुक्यात किती क्रेशर आहेत याच कालावधीमध्ये किती लोकांनी मुरमाचे चालन भरलेले आहेत तसेच तहसील कार्यालयामार्फत कितींना नाहरकतीचे आदेश आहेत वरील सर्व बाबींची माहिती मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गोविंद वड यांनी माहितीच्या आधाराखाली माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
त्यासंदर्भात एकाही मुद्द्याची समाधानकारक माहिती मिळाली नसल्यामुळे व गुत्तेदारांनी संबंधितांशी संगणमत करून लाखो ब्रास मुरूम, गिट्टी रॉयल्टी न भरता लंपास करून शासनास लाखो करोडो रुपयांचा चुना लावुन फसविले आहे. संबंधित प्रकरणी समाधानकारक माहिती मिळाली नसल्यामुळे या प्रकरणाची तात्काळ जिल्हाधिकारी साहेबांनी सखोल चौकशीचे आदेश द्यावेत व संबंधितावर कठोर कार्यवाही व्हावी अन्यथा 26 जानेवारी पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते गोविंद वड यांनी दिलेली आहे.


