दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई-पिक नोंदणीसाठी तारीख वाढवून देण्याची मागणी कंधार तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.कंधार तालुका डोंगराळ असल्यामुळे इंटरनेट सेवा बरोबर मिळत नाही.त्यामुळे ई-पिक पाहणी करण्यासाठी अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत.शासनाच्यावतीने १५ जानेवारी शेवटचा दिवस देण्यात आला असून आतापर्यंत मोजक्याच शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी केली आहे.जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशानुसार कंधार तालुक्यातील रब्बी हंगामातील ई-पिक नोंदणीसाठी शनिवारी विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात आली.कंधार कार्यक्षेत्रातील तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक तसेच सर्व गावातील सुधारीत शेतकरी, सरपंच, उपसरपंच, चेअरमन,पोलिस पाटील,सेतू केंद्र चालक,रास्त भाव दुकानदार यांनी विविध गट तयार करून शनिवारी ई-पिक नोंदणी करण्यात आली. नोंदणीसाठी अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नोंदणी होत नाही.तेव्हा शासनाच्या वतीने ई-पिक नोंदणीसाठी कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना तारीख वाढवून देण्याची मागणी सर्व शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.


