दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पुणे : पुण्यात होणाऱ्या ‘जी २०’ परिषदेसाठी अवघा एक दिवस शिल्लक असून, या परिषदेसाठी उपस्थित राहणारे प्रतिनिधी पुण्यात येण्यास सुरवात झाली आहे.
पुणे – पुण्यात होणाऱ्या ‘जी २०’ परिषदेसाठी अवघा एक दिवस शिल्लक असून, या परिषदेसाठी उपस्थित राहणारे प्रतिनिधी पुण्यात येण्यास सुरवात झाली आहे.
केंद्र सरकारची तसेच पुणे महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिसांची तयारी पूर्ण झाली आहे. १६ आणि १७ जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत शहरांमधील पायाभूत सुविधांच्या जाहीरनाम्यावर मंथन होणार आहे.
पुण्यात’जी २०’ परिषदेअंतर्गत पायाभूत सुविधा कार्यगटाची(आयीडब्ल्यूजी) पहिली बैठक होत आहे. आयडब्लूजी सदस्य देश, निमंत्रित देश आणि निमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी पायाभूत सुविधा जाहीरनाम्यावर चर्चा करणार आहेत. वित्त मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभागाकडे याबैठकीचे यजमानपद असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलचे प्रतिनिधी बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवतील. भारतात होणाऱ्या या परिषदेसाठी ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना असणार आहे.
पायाभूत सुविधा कार्यगट मालमत्ता श्रेणी म्हणून विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधांसह पायाभूत सुविधा गुंतवणुकीचे विविध पैलू, दर्जेदार सुविधांसाठी गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक संसाधने जमा करण्यासाठी साधनांची निवड करणे या विषयांवर विचारमंथन केले जात आहे .या कार्यगटाची फलनिष्पत्ती जी २० फायनान्स ट्रॅक प्राधान्यक्रमांमध्ये वापरली जाते आणि पायाभूत सुविधा विकासाला प्रोत्साहन दिले जाते.


