दैनिक चालु वार्ता लोहा/प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील मौजे जवळा देशमुख येथील जेष्ठ व प्रतिष्ठित महिला श्रीमती अच्छानबाई रामराव देशमुख (वय १०७ वर्ष ) यांचे दि.१५ -१-२०२३ रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले,. पाच मुली, नातू ,पणतू असा मोठा परिवार आहे.
त्या बापुसाहेब रामराव देशमुख, व्यंकटराव रामराव देशमुख यांच्या मातोश्री होत्या. कालवश अच्छानबाई रामराव देशमुख यांच्या पार्थिवावर आज दि.१६-१-२०२३ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या जवळा देशमुख येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कालवश श्रीमती अच्छानबाई रामराव देशमुख या जवळा देशमुख येथील जेष्ठ व प्रतिष्ठित महिला होत्या त्या गोरगरिबांना नेहमी मदत करीत असत त्यांच्या या निधनाबद्दल नांदेड दक्षीणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.


