दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
नांदेड जिल्ह्यात माळेगाव नंतर दुसऱ्या क्रमांकाची यात्रा म्हणून श्री सद्गुरू नराशाम महाराज यांची मुखेड तालुक्यातील येवती यात्रा ओळखली जाते. या
यात्रेला इ.स.सके 1693 चा म्हणजेच तीनशे वर्षांपूर्वी चा इतिहास आहे. वरील इ.सनातील श्री सद्गुरू नराशाम महाराज संजीवन समाधी असून तेव्हा पासून येवती यात्रेची परंपरा आहे. यंदा ही यात्रा १५ जानेवारी २०२३ रोजी श्री सद्गुरू नराशाम महाराज संजीवन समाधी महाआरतीने प्रारंभ झाली असून १५ जाने. रोजी शांततेत जंगी कुस्त्या पार पडले आहेत . दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री सद्गुरू नराशाम महाराज समाधी दर्शनासाठी अनेक ठिकाणांहून पायी दिंडया येवतीत दाखल झाल्या होत्या . या दिंड्याच्या राहण्याची व नाश्त्याची सोय येवती येथील श्री सद्गुरू नराशाम महाराज पब्लिक स्कूल शाळेचे संचालक श्री आनंदराव जाधव सर यांच्या वतीने करण्यात आली होती . येणाऱ्या दिंडी चालक महाराजांचा शाळेच्या वतीने पुष्पहार व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर दुसरीकडे मात्र या यात्रेला तालुक्याचे आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्ह्याचे खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर , काँग्रेसचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर सह विविध पक्षाचे अनेक नेते मंडळी येथील संजीवनी समाधी दर्शनासाठी येऊन या यात्रेला भेटी दिल्या आहेत. यंदा या यात्रेला आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ व दुर्गाजी नांदेडकर नाट्य मंडळ लहान मोठे, आकाशी पाळणे, चक्कर गन्ना, कटलरी दुकाने भांड्याची व हॉटेल्स आधी व्यापारी मोठ्या प्रमाणावर आले आहेत. आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच येवती यात्रा अवैध धंदे मुक्त पार पडत असून यंदाच्या येवती यात्रेत देशी दारू गुटखा जुगार मटका अशा प्रकारचे सर्व अवैध धंदे मुखेड पोलीस निरीक्षक विलास गोबाडे साहेब व येवती बीटचे पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड साहेब , व बीट जमदार जाधव साहेब यांनी अवैध धंद्यांना आळा घालून येवती यात्रा शांततेत पार पाडल्याबद्दल तालुक्यातच नव्हे तर अख्या जिल्ह्यात मुखेड पोलीस ठाण्यातील सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे. येवती यात्रा दरवर्षी अशाच प्रकारे शांततेत व अवैध धंदे मुक्त पार पडावे . म्हणून येवती येथील गावकऱ्यांच्या वतीने पोलीस प्रशासनाचे सुद्धा आभार मानण्यात आले आहे.


