दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
आजपर्यंत पादचाऱ्यांना एवढेच ज्ञात होते की, पादचाऱ्यांनी रस्त्याने चालतांना डाव्या बाजूने चालावे परंतु अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने काढलेल्या सुधारित परिपत्रकानुसार अपघाताचे प्रमाण कमी करायचे असेल तर पादचाऱ्यांनी रस्त्याने चालत असतांना डाव्या बाजूने न चालता नेहमी उजव्या बाजूने चालावे आणि त्याबरोबरच सर्व नागरिकांनी रस्ता सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे मत मुखेड न्यायालयाचे दिवाणी न्यायाधिश वाय.बी.गमे यांनी शहरातील जि.प.मुलींचे हायस्कूल येथे दि.१७ जानेवारी २०२३ रोजी जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडच्या वतीने आयोजित केलेल्या ‘वाॅक ऑन राईट’ या अभियान कार्यक्रमाच्या अधिक्षीय समारोप प्रसंगी व्यक्त केले
मार्गदर्शन कार्यक्रमाच्या समारोपानंतर वाॅक राईटचे, रस्ता सुरक्षे विषयी नारे देत व विद्यार्थ्यांच्या हातात फलके देऊन शहरातील मुख्य रस्त्याने भव्य रॅली काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी बसमध्ये चढतांना व उतरतांना कोणकोणती काळजी घ्यावी याविषयी शालेतील सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना सविस्तर मार्गदर्शन जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुखेड न्यायालयाचे न्यायाधीश वाय.बी.गमे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन न्यायाधीश एन.एस.बारी, न्यायाधीश एम.एस.पौळ, नायब तहसिलदार महेश हांडे, पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे, प्राचार्य एस.बी.अडकीने, केंद्रप्रमुख मधुकर गायकवाड, मुख्याध्यापक एम.आर.कांबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख, राजे छत्रपती अकॅडमीचे संचालक माजी सैनिक ज्ञानेश्वर पाटील डुमणे, सहशिक्षक दिपक लोहबंदे, सदाशिवराव पाटील चिवळीकर, प्रा.चंद्रकांत एकलारे,जेष्ठ पत्रकार सुशील पत्की, ॲड. सुनिल पौळकर, ॲड. मिलिंद कांबळे, अहेमद शेख बेळीकर यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक राघवेंद्र पाटील यांनी तर सुत्रसंचलन श्रावण नरबागे मंडलापुरकर यांनी केले तसेच रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक नितिन राख यांनी सादर केले तर उपस्थितांचे आभार सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक अमोल सोमदे यांनी मानले. यावेळी जि.प.हायस्कूल मुलींचे मुखेड प्रशाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व मुखेड येथील सर्व ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक, पदाधिकारी यांच्यासह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…


