दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- शहरातील इतवारा मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्याला गुन्हे शाखेच्या पोलीसांनी रंगेहात पकडले.आरोपी मोहम्मद बाजद अब्दुल नाशीद कुरेशी याच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे २२ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,गुन्हे शाखेचे पोलीसांचे पथक गुरुवारी आयुक्तालय परिसरात गस्तावर असताना यावेळी पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की,कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील इतवारा बाजार येथील रुपेश गुल भंडारजवळ डीलर एमडी ड्रग्ज विकायला येत आहे.तात्काळ गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठून तेथे दोन तास सापळा रचला.त्यावेळेस त्यानंतर हा डीलर आरोपी मोहम्मद वजीर अब्दुल नासीर कुरेशी (४०,गवळीपुरा) तेथे पोहोचला आणि ग्राहकाची वाट पाहत होता.पोलीसांना मोहम्मद वजीरचा संशय येताच त्यांनी त्याला घेरले आणि पकडले.त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून २२ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.पोलीसांनी मोहम्मद वजीरला अटक करून त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.तिथेच ड्रग्ज आणि दुचाकीसह १ लाख ५२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय नरेशकुमार मुंडे,राजीवआप्पा बाहेनकर,फिरोज खान,सतीश देशमुख,सुरज चव्हाण,निवृत्ती काकड,सुधीर गुढधे यांनी केली.
—————————————-
पोलीस स्टेशन अंतर्गत अवैद्य धंदे आढळल्यास ठाणेदार राहील जबाबदार पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे कडक आदेश
अमरावती शहरातील अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी सर्व ठाणेदारांना सक्त निर्देश देण्यात आले की,आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आढळून आल्यास त्यास ठाणेदार जबाबदार राहतील असे सक्त आदेश अमरावतीतील सर्व ठाणेदारांना देण्यात आले.सिपी यांच्या ह्या आदेशाने सर्व पोलीस स्टेशन मध्ये खळबळ माजली आहे.


