दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी
देगलूर तालुक्यातील सुंडगी येथील शेतकरी पुत्र शिवराज संग्राम पाटील यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा आज श्री अनिल पाटील खानापूरकर माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा सचिव यांच्यावतीने सत्कार करण्यात आले. यावेळी अशोक पाटील डुकरे तालुका सरचिटणीस भारतीय जनता पार्टी देगलूर, नागेश बक्कनवार ग्रा प सदस्य खानापूर , पांडुरंग लालू कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य सुंडगी दिगंबर राव पाटील सुंडगी, भीमराव दिपके सुरेश देशमुख हावरगेकर,तमलूरकर साहेब गावातील सर्व पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते


