दैनिक चालु वार्ता म्हसळा – प्रतिनिधी – अंगद कांबळे
खासदार सुनिल तटकरे आणि आमदार आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने म्हसळा तालुक्यातील अत्यंत दुर्गम ठिकाणी वसलेल्या तोराडी बंडवाडीतील ग्रामस्थांना रहदारीचा मार्ग सुखकर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजानिक बांधकाम विभागा मार्फत ३०५४ मार्ग व पुल दुरुस्ती योजने अंतर्गत सन २०२० मध्ये डांबरीकरण रस्ता बांधकामाला मंजुरी मिळवुन दिला. देशाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात तोराडी गावजोड डांबरीकरण रस्त्याचे कामाचा शुभारंभ झाल्याने ग्रामस्थांचे चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला असला तरी आता रस्ता होऊन नऊ महीने उलटुन गेले तरी डांबरीकरण केलेल्या रस्त्याला अखेरचा हात (कार्पेटचे काम) फिरणे बाकी असल्याने तोराडी ग्रामस्थ चिंतेत असल्याचे गाव पुढारी मनोज कातलकर, सुरेश विचारे यांनी माहिती देताना सांगीतले.सदरचे काम सा.बा.विभाग महाड यांचे मार्फत खाजगी कंत्रादाटारांकडून करण्यात आले आहे.तीव्र चडउतार असलेला रस्त्याचे करण्यात आलेले काम आता हळूहळू नादुरूस्त होण्याचे मार्गावर आहे. तयार करण्यात आलेल्या रस्त्याचा दर्जा अधिकपणे टिकण्यासाठी डांबरी रस्त्यावर वेळीच कार्पेटचे काम करणे गरजेचे असल्याने संबंधित बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांनी तोराडी रस्त्याचे बांधकाम वेळीच पुर्ण करावे अशी मागणी मनोज कातलकर यांनी केली आहे.


