
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी जालना-आकाश माने
वाघ्रुळ- जालना तालुक्यातील मराठवाडा विदर्भ सीमेवर असलेले मराठवाड्यातील वाघ्रुळ ह्या गावात डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या साडे तीनशे वर्षांपूर्वी चे जगदंबा माता मंदिरावर नियमित सातत्याने कार्यक्रम चालू असते तसेच सध्या गेल्या सात दिवांपासून शत चंडी यज्ञ सोहळा पूजा मोठ्या थाटामाटात चालू आहे या शतचंडी याग सोहळ्याची सांगता डॉ गुरूवर्य ह भ प भगवान बाबा आनंदगडकर यांच्या हस्ते कीर्तन सेवेतून होणार आहे व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल अश्या प्रकारे या सोहळ्याची सांगता येथील रहिवासी यांच्या सांगण्यावरून निदर्शनास येत आहे.